• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, August 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2026

अखेर ‘एमडी’ बदलले! अण्णासाहेब पाटील महामंडळात नरेंद्र पाटील यांचा दबाव यशस्वी?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रविवारी माथाडी भवनात भरणार लाभार्थ्यांचा मेळावा

शीतल पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी उचलबांगडी

अविनाश रणखांब नवे एमडी,

‘अध्यक्षपद शोभेचे राहिले’ म्हणणाऱ्या नरेंद्र पाटलांच्या आक्रमक भूमिकेला यश?

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील अध्यक्ष विरुद्ध व्यवस्थापकीय संचालक वादाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा समाजातील नवउद्योजकांच्या तक्रारी आणि महामंडळाच्या कारभारावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

नरेंद्र पाटील विरुद्ध एमडी संघर्षाचा शेवट?

गेल्या काही दिवसांपासून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एमडी विजयसिंह देशमुख यांच्या कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मराठा तरुणांना अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पाटील यांनी तर यापुढे जात “अध्यक्षपद शोभेचे राहिले आहे, आमचे हात बांधले आहेत; हे पद ठेवून करू काय?” अशी खंत व्यक्त करत अध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले होते. एमडींच्या कारभारामुळे मराठा समाजाचे नुकसान होत असून सरकारलाही अडचणीत आणले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

तरुणांच्या तक्रारींचा मुद्दा ठरला निर्णायक?

महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभारू पाहणाऱ्या मराठा तरुणांच्या मंजूर कर्जप्रकरणांमध्ये अडथळे, LOI रद्द होणे आणि उत्पन्नाच्या अटींमध्ये बदल यासंदर्भात तक्रारी समोर आल्या होत्या.

अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून तरुणांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर या प्रश्नांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचे वृत्त आहे.

‘मराठाद्वेषी अधिकारी’च्या आरोपाने वाद चिघळला

एमडी विजयसिंह देशमुख यांच्यावर नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी ‘मराठाद्वेषी अधिकारी’ असल्याचा गंभीर आरोप केला होता. शासनाच्या नियमांपेक्षा वेगळ्या उत्पन्नाच्या अटी लावण्यात आल्याने अनेक तरुणांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला होता.

देशमुख यांच्या कारभारामुळे सरकार आणि मराठा समाजामध्ये दुरावा निर्माण होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला होता. या आरोपांमुळे महामंडळातील प्रशासकीय संघर्ष थेट राजकीय पातळीवर पोहोचला होता.

आता अविनाश रणखांब यांच्यासमोर मोठे आव्हान

विजयसिंह देशमुख यांच्यानंतर आता अविनाश रणखांब यांच्याकडे महामंडळाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे नव्या एमडींसमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे मराठा तरुणांमधील नाराजी दूर करणे आणि महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करणे.

विशेषतः प्रलंबित कर्जप्रकरणे, रद्द झालेली LOI, उत्पन्नाच्या अटी आणि लाभार्थ्यांच्या तक्रारी यावर रणखांब कोणती भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

राजीनाम्याची वेळ येण्याआधीच ‘एमडी’ बदलले!

नरेंद्र पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच महामंडळातील कारभारावर नाराजी व्यक्त करत अध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत एमडी बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हा निर्णय म्हणजे नरेंद्र पाटील यांच्या दबावाला मिळालेले यश आहे का, की सरकारने महामंडळातील प्रशासकीय वाद संपवण्यासाठी घेतलेला स्वतंत्र निर्णय आहे, यावर आता राजकीय चर्चा रंगणार आहे.

मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे—अण्णासाहेब पाटील महामंडळातील अध्यक्ष विरुद्ध एमडी संघर्षाने सरकारचे लक्ष वेधून घेतले आणि आता एमडी बदलाच्या रूपाने या संघर्षाचा पहिला अंक संपला आहे.

आता खरी परीक्षा नव्या एमडींची आणि नरेंद्र पाटलांचीही!

रणखांब यांच्या काळात महामंडळाचा कारभार गतिमान झाला आणि मराठा तरुणांच्या तक्रारी दूर झाल्या तर हा बदल यशस्वी मानला जाईल; अन्यथा महामंडळातील राजकीय संघर्षाचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Previous Post

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com