• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, August 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2026

जुईपाडा स्मशानभूमीत नशेखोरांचा अड्डा?

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईपाडा स्मशानभूमीत नशेखोरांचा अड्डा?

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

गांजा, मद्यपान आणि असामाजिक घटकांचा वाढता वावर

अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पूर्णवेळ स्थानिक ग्रामस्थांची नियुक्ती करण्याची नगरसेविका डॉ. प्रणाली पाटील यांची मागणी

नवी मुंबई : नेरुळ विभागातील जुईपाडा गावातील सेक्टर २३ परिसरात असलेल्या ग्रामस्थांच्या स्मशानभूमीत असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वाढता वावर स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. स्मशानभूमी परिसरात काही व्यक्ती गांजा ओढणे, मद्यपान करणे तसेच नशेचे पदार्थ सेवन करत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या आहेत. दिवसा-रात्री या व्यक्तींचा वावर सुरू असल्याने परिसरातील नागरिक तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत पूर्णवेळ स्थानिक ग्रामस्थांची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नगरसेविका डॉ. प्रणाली काशिनाथ पाटील यांनी जुईपाडा गावातील महिलांच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

विशेष म्हणजे, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांनीही गेल्या तीन वर्षांपासून या प्रश्नाचा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

स्मशानभूमीत दिवसरात्र नशेखोरांचा वावर

महापालिका कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत जुईपाडा गावातील ही स्मशानभूमी गेल्या काही वर्षांपासून गैरसोयींच्या विळख्यात सापडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीत गर्दुले, भिकारी तसेच इतर असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढला आहे.

स्थानिकांच्या निवेदनानुसार, काही व्यक्ती या ठिकाणी गांजा ओढणे, मद्यपान करणे तसेच नशेचे पदार्थ सेवन करत असल्याचे प्रकार सुरू आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या व्यक्तींचा वावर वाढत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्रास

स्मशानभूमी ही नागरिकांच्या भावनिकदृष्ट्या संवेदनशील बाबींशी जोडलेली जागा आहे. मात्र येथे असामाजिक व्यक्तींचा वावर वाढल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

अंत्यविधी सुरू असतानाही नशेत असलेल्या व्यक्ती परिसरातून जाण्यास तयार नसतात, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी स्मशानभूमीत कायमस्वरूपी देखरेख व्यवस्था आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दारूच्या बाटल्या अन् अस्वच्छतेचे साम्राज्य

मद्यपानामुळे स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता निर्माण होत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. परिसरात दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असतात. काही बाटल्या कचरापेटीत टाकल्या जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

नशेत असलेल्या व्यक्तींमध्ये वाद आणि भांडणे होत असल्याने परिसरातील वातावरण बिघडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अनुचित घटना घडण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

चोरी, लूटमारीची भीती

स्मशानभूमीत अनोळखी व्यक्तींचा वाढता वावर पाहता परिसरात चोरी किंवा लूटमारीसारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच नशेत असलेल्या व्यक्तींमुळे अपघाताच्या घटनाही घडत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

त्यामुळे हा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित असल्याचे डॉ. प्रणाली पाटील यांनी म्हटले आहे.

‘स्थानिक ग्रामस्थांनाच सुरक्षा व्यवस्था द्या’

स्मशानभूमीच्या सुरक्षेसाठी बाहेरील व्यक्ती नियुक्त करण्याऐवजी स्थानिक ग्रामस्थांची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी डॉ. प्रणाली पाटील यांनी केली आहे. स्थानिक ग्रामस्थांना परिसराची पूर्ण माहिती असल्याने असामाजिक घटकांवर नियंत्रण ठेवणे, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सहकार्य करणे आणि स्मशानभूमीतील शिस्त कायम ठेवणे शक्य होईल. या व्यवस्थेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासही मदत होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तीन वर्षांपासून मागणी; प्रशासनाचे दुर्लक्ष?

माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांनी यापूर्वीही स्मशानभूमीत स्थानिक ग्रामस्थांची नियुक्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र तीन वर्षांनंतरही या मागणीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार’

“स्मशानभूमीतील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने पूर्णवेळ स्थानिक ग्रामस्थांची नियुक्ती करावी. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित महापालिका अधिकारी आणि प्रशासनावर राहील,” असा इशारा डॉ. प्रणाली पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

महापालिकेकडून कार्यवाही सुरू

दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या नियुक्तीबाबत महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे नेरुळ विभागाचे स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांनी सांगितले. याबाबत पुढील निर्णय वरिष्ठ अधिकारी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता प्रशासनाकडून प्रत्यक्षात कधी नियुक्ती केली जाते आणि जुईपाडा स्मशानभूमीतील असामाजिक घटकांचा वावर रोखण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

‘कॅप्टन’ ते ‘भोंदूबाबा’… अशोक खरातच्या साम्राज्याचा पर्दाफाश!

Next Post

नेरूळच्या विक्रमवर कारवाई आणि इतर अतिक्रमणाला राजाश्रय

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नेरूळच्या विक्रमवर कारवाई आणि इतर अतिक्रमणाला राजाश्रय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com