• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, September 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2026

मालेगाव-सांगलीच्या मासळी बाजारांना मंत्री नितेश राणेंचा ‘बूस्टर’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा : मंत्री नितेश राणे

मच्छीमारांच्या सुविधांसाठी राणे मैदानात; मालेगाव-सांगलीचे आधुनिक मासळी बाजार वेळेत पूर्ण करण्याचे आदेश

मच्छीमार, मासळी विक्रेते आणि नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंचा निर्धार

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्याच्या प्रस्तावाला शासनस्तरावर गती देण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजारासोबतच शीतगृह, मासळी विक्री केंद्र आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी योग्य जागा तातडीने निश्चित करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर सांगली येथील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत सुरू असलेल्या आधुनिक मासळी बाजाराचे कामही वेगाने पूर्ण करून उद्घाटनाची तारीख लवकर निश्चित करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. मच्छीमार आणि मासळी विक्रेत्यांना आधुनिक सुविधा देतानाच नागरिकांना स्वच्छ व सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव आणि सांगली येथील मासळी बाजारांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजीता मोहपात्रा यादेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

 

मालेगावसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करून त्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मंत्री राणे यांनी दिले. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पासाठी आवश्यक तो पाठपुरावा करून आधुनिक आणि सर्व सुविधांनीयुक्त मासळी बाजार उभारण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मासळी बाजार हा केवळ विक्रीची जागा न राहता मच्छीमार, मासळी विक्रेते आणि ग्राहकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा आधुनिक केंद्रबिंदू असावा, यावर राणे यांनी भर दिला.

 

शीतगृहासह आवश्यक सुविधा उपलब्ध होणार

मालेगाव येथील प्रस्तावित आधुनिक मासळी बाजारात शीतगृह, मासळी विक्री केंद्र आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक मच्छीमार आणि मासळी विक्रेत्यांना व्यवसायासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळतील. तसेच नागरिकांनाही स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज वातावरणात मासळी खरेदी करता येणार आहे. मासळी व्यवसायाला अधिक शिस्तबद्ध, आधुनिक आणि सुविधायुक्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला महत्त्व असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

 

सांगलीचा प्रकल्पही राणेंच्या रडारवर

दरम्यान, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सांगली येथे विकसित होत असलेल्या आधुनिक मासळी बाजाराच्या कामाचाही मंत्री राणे यांनी आढावा घेतला. प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती घेतल्यानंतर बांधकामाचे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. सांगलीतील आधुनिक मासळी बाजाराचे काम वेळेत पूर्ण करून उद्घाटनाची तारीख लवकर निश्चित करा, अशा स्पष्ट सूचना राणे यांनी दिल्या. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होऊ नये आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

सानपाड्यात गोकुळाष्टमीच्या दिनी रंगणार साईभक्त सेवा मंडळाच्या दहीहंडीचा थरार

Next Post

अमरावतीसारखी आग नवी मुंबईत लागल्यानंतर नवजात बालकांची प्रेतं बाहेर काढायची वाट मनपा बघतेय का? : तुषार कचरे

Next Post
अमरावतीसारखी आग नवी मुंबईत लागल्यानंतर नवजात बालकांची प्रेतं बाहेर काढायची वाट मनपा बघतेय का? : तुषार कचरे

अमरावतीसारखी आग नवी मुंबईत लागल्यानंतर नवजात बालकांची प्रेतं बाहेर काढायची वाट मनपा बघतेय का? : तुषार कचरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com