• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, September 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2026

सानपाड्यात गोकुळाष्टमीच्या दिनी रंगणार साईभक्त सेवा मंडळाच्या दहीहंडीचा थरार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सानपाड्यात गोकुळाष्टमीच्या दिनी रंगणार साईभक्त सेवा मंडळाच्या दहीहंडीचा थरार

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसंस्था : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमीच्या दिनी सानपाड्यात साई भक्त सेवा मंडळाच्या दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार आहे.
नवी मुंबईतील प्रतिष्ठित व बहूचर्चित असलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये सानपाड्यातील साई भक्त सेवा मंडळाच्या दहीहंडीचा समावेश होत आहे. गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे, डीजेवरील गाण्यांची मस्ती, गोविंदा पथकांची मोठ्या संख्येने उपस्थिती यामुळे साई भक्त सेवा मंडळाच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी सभोवतालच्या परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
साई भक्त सेवा मंडळाकडून सलग सहाव्या वर्षीही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सानपाडा सेक्टर आठमधील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानावर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. समाजसेवक पांडुरंग आमले हे या उत्सवाचे आयोजक आहेत. दरवर्षी या उत्सवामध्ये बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, भाजपचे नेते निलेश म्हात्रे यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व अन्य पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत असतात.
दरवर्षी या दहीहंडी उत्सवामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरणसह पुण्यातील गोविंदा पथकेही सहभागी होत असतात. यामध्ये मुंबईतील सहा-सात महिला गोविंदा पथकांचाही समावेश असतो. यावर्षी प्रथमच मुंबईतील अंध युवकांचे गोविंदा पथकही या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहे. यावर्षीही ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची बक्षिसे गोविंदा पथकांना देण्यात येणार असून सलामी देणाऱ्या पथकांनाही बक्षिसे देण्यात येणार आहे. गोविंदा उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या गोविंदाप्रेमींच्या मनोरंजनासाठी डीजे कांचन जाधव यांच्या आर्केस्ट्राही ठेवण्यात आला आहे.
हा दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी साई भक्त सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग आमले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व स्थानिक विभागातील गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवाशीही परिश्रम घेत आहेत.

Previous Post

प्रभाग २३ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, भाजपला बळकटी

Next Post

मालेगाव-सांगलीच्या मासळी बाजारांना मंत्री नितेश राणेंचा ‘बूस्टर’

Next Post
फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा : मंत्री नितेश राणे

मालेगाव-सांगलीच्या मासळी बाजारांना मंत्री नितेश राणेंचा ‘बूस्टर’

अमरावतीसारखी आग नवी मुंबईत लागल्यानंतर नवजात बालकांची प्रेतं बाहेर काढायची वाट मनपा बघतेय का? : तुषार कचरे

अमरावतीसारखी आग नवी मुंबईत लागल्यानंतर नवजात बालकांची प्रेतं बाहेर काढायची वाट मनपा बघतेय का? : तुषार कचरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com