• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, September 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 6, 2026

सानपाड्यातील डीजेमुक्त दहीहंडी उत्सवात १७४ मंडळांचा थरार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाड्यातील डीजेमुक्त दहीहंडी उत्सवात १७४ मंडळांचा थरार

नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रतिष्ठची व मानाच्या दहीहंड्यामध्ये गणली जाणारी सानपाड्यातील साई भक्त सेवा मंडळ., साई भक्त महिला फांउडेशनची ‘साई दहीहंडी’ यंदा डीजेमुक्त दहीहंडी म्हणून गणली गेली. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड या भागातून तब्बल १७४ गोविंदा पथके या उत्सवात सहभागी झाली. काळाचौकी येथील न्यू परशूराम मित्र मंडळाच्या गोविंदांनी आठ थर लावत ही दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.

साई भक्त सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या पुढाकारातून सानपाडा सेक्टर आठमधील हुतात्मा  बाबू गेनू सैद मैदानावर हा दहीहंडी उत्सव सकाळी ११.३० वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत रंगला होता. विशेष म्हणजे या उत्सवामध्ये कोठेही डीजे वाजविण्यात आला नाही. कर्णकर्कश आवाजाचा कोलाहल नसल्याने सानपाडावासियांनी पांडुरंग आमले यांच्या डीजेमुक्त गोविंदा या संकल्पनेचे स्वागत केले.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील १७२ पुरुष गोविंदा पथकांनी तर २ महिला गोविंदा पथकांनी या उत्सवात सलामी दिली. विशेष म्हणजे बाल गोपाळ मित्र मंडळ – घाटकोपर, न्यू परशूराम मित्र मंडळ – काळाचौकी, संघर्ष गोविंदा पथक – फेरबंदर, बालविकास मित्र मंडळ – घाटकोपर या चार गोविंदा पथकांनी आठ थर लावले. २२ मंडळांनी ७ थर लावत सलामी दिली. यावेळी आलेल्या गोविंदा पथकांनी  ७ थर लावत ४० हंड्या फोडल्या. शिवसेना नेते व माजी खासदार राहूल शेवाळे यांची तीन गोविंदा पथकेदेखील या उत्सवात सहभागी झाली होती.

या दहीहंडी उत्सवामध्ये भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर अखिल भारतीय माथाडी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय बुवा कुलकर्णी, नगरसेवक सुनील कुरकटे,  शिंदे गट शिवसेनेचे नवी मुंबई उपशहरप्रमुख अविनाश जाधव, उबाठा  शिवसेना गटाचे पदाधिकारी तानाजी चव्हाण पाटील, महेश बनकर, भाजपचे सानपाडा प्रभारी विसाजी लोके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सीवूडस तालुका अध्यक्ष दिनेश बांगर, मनसेचे उपशहरप्रमुख योगेश शेटे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या सुहासिनी नायडू, भाऊ भापकर मित्र मंडळाचे पदाधिकारी राजू सैद व व सदस्य, ज्येष्ठ नागरिक विंरंगुळा केंद्राचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी,तसेच सानपाडा, वाशी, जुईनगर, नेरूळमधील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

१७४ गोविंदा पथकांचा थरार पाहण्यासाठी मैदानामध्ये चारह हजारांहून अधिक स्थानिक रहिवाशांनी हजेरी लावली होती. गोविंदा पथक व गोविंदा प्रेमींच्या मनोरंजनासाठी दीपज्योती इव्हेंन्टच्या कांचन जाधव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची स्टार नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या पथकातील तृप्ती पाटील यांनी यावेळी नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. डीजेमुक्त दहीहंडा व सानपाडा पोलिसांच्या सहकार्याने हा दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला असल्याची माहिती आयोजक पांडुरंग  विठ्ठल आमले यांनी दिली.

Previous Post

काळानुरूप शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल घडविला पाहिजे : संदीप नाईक

Next Post

सायकल वाटप कार्यक्रमासह रो-रो बोटीत बसण्याचा लुटला मुलींनी आनंद

Next Post
सायकल वाटप कार्यक्रमासह रो-रो बोटीत बसण्याचा लुटला मुलींनी आनंद

सायकल वाटप कार्यक्रमासह रो-रो बोटीत बसण्याचा लुटला मुलींनी आनंद

एका शिक्षकाच्या ध्यासाने शाळेचे नशीब बदलले

एका शिक्षकाच्या ध्यासाने शाळेचे नशीब बदलले

इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

S.I.R. नोटीसधारकांसाठी ऑल इंडिया उलमा बोर्डाची मोफत कायदेशीर मदत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com