• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2026

ओबीसींच्या आकडेवारीशी खेळाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
ओबीसींच्या आकडेवारीशी खेळाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही!

ओबीसी जनगणनेवरून नाना पटोलेंचा सरकारला इशारा

जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

खुल्या प्रवर्गात ढकलण्याचा मोदी सरकारचा डाव

नाना पटोलेंचा राज्यपालांकडे धाव, जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी

मुंबई : ओबीसी समाजाची जातनिहाय आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न करून त्यांना खुल्या प्रवर्गात ढकलण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला. जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना ठेवून प्रत्येक जात व उपजातीची अचूक नोंद करावी, अशी मागणी त्यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली.

पटोले यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले. ओबीसींची अधिकृत जातनिहाय संख्या स्पष्ट झाल्याशिवाय आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि कल्याणकारी योजनांचे न्याय्य नियोजन होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जनगणनेच्या अर्जातील प्रश्नांच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बिहार आणि तेलंगणाच्या धर्तीवर देशभर जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी पटोले यांनी केली. खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवूनही उत्तर मिळाले नसल्याचा दावाही त्यांनी केला.

 महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा!

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी संकटात सापडल्याचे सांगत पटोले यांनी फडणवीस सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे आव्हान दिले. शेतकरी आणि शेतमजुरांना भरीव आर्थिक मदत देण्यासोबतच जनावरांसाठी चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“ओबीसींच्या हक्काचा प्रश्न असो किंवा दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारने आता कागदावरील आश्वासनांपलीकडे जाऊन निर्णय घ्यावा,” असा थेट इशारा पटोले यांनी दिला.

Previous Post

भाजपच्या प्रितम म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे जावळे गाव खड्डेमुक्त!

Next Post

फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

Next Post
फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

उंब्रज नंबर दोनमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार !

आळे परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; अवघ्या दोन तासांत १२ जणांना चावा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com