• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, September 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2026

आळे परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; अवघ्या दोन तासांत १२ जणांना चावा!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
उंब्रज नंबर दोनमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार !

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नऊ जण गंभीर जखमी

पुणे, मंचर, नारायणगावला उपचारासाठी हलविले

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची नागरिकांची मागणी

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील आळे गावात पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सायंकाळी अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या दोन तासांत या कुत्र्याने गावातील तब्बल १२ नागरिकांना चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यातील नऊ जण गंभीर जखमी झाले असून, काही जखमींना पुढील उपचारासाठी पुणे, मंचर आणि नारायणगाव येथील रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.

सायंकाळी चार ते सहा या वेळेत कुत्र्याने गावातील विविध भागांत नागरिकांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ले केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये काही काळ मोठी घबराट पसरली. जखमींना तातडीने आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

गंभीर जखमींमध्ये हौसाबाई वाघमारे (७६), शालिनी डोंगरे (९०), मंगल सूर्यवंशी (४५), मंहमंद दाजी (६०), जया साबळे (३५), प्रणिता अभंग (३६), हेमंत पिंजारी (४५), मनिषा वाघचौरे (४०) आणि धोंडिभाऊ घातापुणे (६५) यांचा समावेश आहे.

हौसाबाई वाघमारे यांना पुढील उपचारासाठी पुण्यात, चार जखमींना मंचर येथे, तर एका जखमीला नारायणगाव येथे हलविण्यात आले आहे.

 

भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा

या घटनेनंतर आळे परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून भटक्या व आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठवू नये आणि आक्रमक कुत्रा आढळल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोट

“बारा जणांना कुत्र्याने चावा घेतला असून सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यापैकी एका जखमीला वायसीएम रुग्णालयात, तर चार जणांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.”
— डॉ. अमोल बांगर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आळे

Previous Post

फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

Next Post

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईंचा आयुक्तांना थेट सवाल; जुईनगरच्या पाण्यासह स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर!

Next Post
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईंचा आयुक्तांना थेट सवाल; जुईनगरच्या पाण्यासह स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर!

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईंचा आयुक्तांना थेट सवाल; जुईनगरच्या पाण्यासह स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर!

प्रिटोरियात रंगणार युवा इनडोअर क्रिकेटचा विश्वकप!

प्रिटोरियात रंगणार युवा इनडोअर क्रिकेटचा विश्वकप!

गणेशभक्तांच्या कोकणवारीला शिवसेनेचा ‘मोफत एसटी’चा आधार!

गणेशभक्तांच्या कोकणवारीला शिवसेनेचा ‘मोफत एसटी’चा आधार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com