• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, September 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2026

नेरूळ रेल्वे स्टेशन अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यातून मुक्त न केल्यास उपोषण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ रेल्वे स्टेशन अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यातून मुक्त न केल्यास उपोषण

व्यसनमुक्ती जनजागृतीकार दिलीप आमले यांचा इशारा

नवी मुंबई : नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसर आजमितीला पूर्णपणे अमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यात अडकला असून या स्टेशन परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांव १५ दिवसाच्या आत कायदेशीर कारवाई न झाल्यास व या समस्येचा समूळ नाश न झाल्यास बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा व्यसनमुक्ती जनजागृतीकार दिलीप आमले यांनी दिला आहे.

नेरूळ रेल्वे स्टेशन परिसर दोन्ही बाजूला खुलेआमपणे अमली पदार्थाची विक्री करताना महिला पहावयास मिळतात. स्टेशनचा आतील व बाहेरील परिसर भिक्षेकऱ्यांनी व्यापला आहे. रेल्वे, महापालिका, पोलीस कारवाई करत नसल्याने स्टेशनच्या दोन्ही बाजूस अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय फोफावला असल्याचा संताप दिलीप आमले यांनी व्यक्त केला आहे.

बेमुदत उपोषणाबाबत व या समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी दिलीप आमले यांनी नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाताताई पाटील, नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त – गुन्हे अन्वेषण विभाग, अंमली पदार्थ विरोधी विभाग- नवी मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक – नेरूळ पोलीस स्टेशन,  सहाय्यक आयुक्त/वार्ड अधिकारी – नवी मुंबई महापालिका, नेरूळ या सर्वांना विस्तृतपणे निवेदन सादर केले आहे.

निवेदनामध्ये दिलीप आमले यांनी नेरूळ स्टेशन पूर्व-पश्चिम परिसरातील अंमली पदार्थ विक्रीवर तात्काळ व कडक कायदेशीर कारवाई करावी, फेरीवाल्यांच्या आडून नशेचे पदार्थ विक्री होत असल्यास त्याची कायदेशीर तपासणी व कारवाई करावी, गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या मारामारी व गुन्हेगारी प्रकारांना आळा घालावा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा, पोलीस, महानगरपालिका व अंमली पदार्थ विरोधी विभाग यांच्या संयुक्त कारवाईचे कायमस्वरूपी नियोजन करावे, केवळ एक-दोन दिवसांची कारवाई न करता सातत्यपूर्ण देखरेख व कायदेशीर कारवाई करावी या मागण्या केल्या असून संबंधित प्रशासनाने पुढील १५ दिवसांत ठोस कायदेशीर कारवाई व कायमस्वरूपी बंदोबस्त न केल्यास लोकहितासाठी व्यसनमुक्ती जनजागृतीच्या माध्यमातून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलीप आमले यांनी दिला आहे.

Previous Post

माधुरीची घरवापसी; पण वंताराची माया कायम!

Next Post

नेरुळ सेक्टर-८ मध्ये रविवारी मलनिःसारण वाहिन्यांच्या सुधारणा कामाचा शुभारंभ

Next Post
नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस : महापौर सुजाता पाटील

नेरुळ सेक्टर-८ मध्ये रविवारी मलनिःसारण वाहिन्यांच्या सुधारणा कामाचा शुभारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com