• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, October 13, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 13, 2026

‘सोमेश्वर’च्या निकालावरुन सुनेत्रा पवारांच्या सहकारातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘सोमेश्वर’च्या निकालावरुन सुनेत्रा पवारांच्या सहकारातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : एकीकडे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंड, दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे आव्हान आणि सभासदांमधील नाराजीची चर्चा… अशा तिहेरी राजकीय वातावरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाजी मारली. त्यांच्या नेतृत्वाखालील श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत २१-० असा निर्विवाद विजय मिळविला. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही महत्त्वाची राजकीय लढाई जिंकत सुनेत्रा पवार यांनी सहकाराच्या राजकारणात आपले नेतृत्व अधोरेखित केले आहे.

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक यंदा केवळ संचालक मंडळ निवडण्यापुरती मर्यादित राहिली नाही; तर ती राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि सुनेत्रा पवार यांच्या राजकीय नेतृत्वाची कसोटी ठरली. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. जगताप यांनी वैयक्तिक संपर्क आणि गावोगावी प्रचाराच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली. त्यामुळे सत्ताधारी पॅनेलसमोर अनपेक्षित आव्हान उभे राहिले. मात्र, या आव्हानाची जाणीव होताच राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची सूत्रे वेगाने हलवली. जिल्ह्यातील पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रचारावर लक्ष केंद्रित केले. गावोगावी भेटी, सभासदांशी थेट संवाद, बैठका आणि प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखण्यात आली.

निवडणुकीत नाराज सभासद आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे राष्ट्रवादीसमोरील महत्त्वाचे आव्हान होते. सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घेत सभासदांना साद घातली. सोमेश्वर मंदिर परिसरातील प्रचारसभेतही त्यांनी आपल्या पॅनेलला साथ देण्याचे आवाहन केले. वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणा प्रचारात उतरल्याने निवडणुकीला प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झाले. दुसरीकडे, पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलनेही जोरदार प्रचार केला. सर्वसामान्य उमेदवारांना संधी देत जगताप यांनी वैयक्तिक संपर्कावर भर दिला. शरदचंद्र पवार पक्षाच्या सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व युवानेते युगेंद्र पवार यांनी केले. मात्र, मुख्य राजकीय संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि जगताप यांच्या पॅनेलमध्येच रंगला.

२१-० चा निकाल; पण खरी कसोटी पुढे!

सर्वच्या सर्व २१ जागांवर मिळविलेला विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठे संघटनात्मक यश मानले जात आहे. जगताप यांच्या बंडखोरीनंतर निर्माण झालेले आव्हान परतवून लावत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने कारखान्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले. या निकालामुळे अजित पवार यांच्या पश्चात सहकार क्षेत्रातील नेतृत्वाची धुरा सांभाळण्याच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. मात्र, निवडणुकीतील विजय म्हणजे सभासदांची नाराजी संपली, असा त्याचा अर्थ होत नाही. कारखान्याचा कारभार, सभासदांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हित आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय या आघाड्यांवर नव्या नेतृत्वाला आपली कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे सोमेश्वरचा निकाल हा केवळ २१ जागांचा विजय नसून, आगामी सहकार आणि स्थानिक राजकारणासाठी दिशादर्शक ठरणारी घडामोड आहे.

Previous Post

वाशीत मनसेचा एल्गार! ‘ज्ञानेश कुमार, राजीनामा द्या’; स्वाक्षरी मोहिमेतून संतापाचा उद्रेक

Next Post

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा ‘आगडोंब’! मुंबई उपनगरांत पारा ३८.२ अंशांवर

Next Post
ऑक्टोबरमध्ये उन्हाचा ‘आगडोंब’! मुंबई उपनगरांत पारा ३८.२ अंशांवर

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा ‘आगडोंब’! मुंबई उपनगरांत पारा ३८.२ अंशांवर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com