• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, October 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2026

माझगाव डॉकमधील सुमारे तीन हजार कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण करा : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

adminbyadmin
in मुंबई
0
बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : माझगाव डॉकमधील सुमारे तीन हजार फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगाराचे व भविष्याचे संरक्षण करून त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच माझगाव डॉकसाठी प्रस्तावित पी-७५१ प्रकल्प मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

माझगाव डॉकमधील फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगारासह प्रस्तावित पी-७५१ प्रकल्पाबाबत मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

कामगार मंत्री म्हणाले, माझगाव डॉक ही आस्थापना राज्य कामगार आयुक्ता लयाच्या कार्यकक्षेत येत नसून केंद्र शासनाशी सबंधित आस्थापना आहे. तथापी, कामगारांच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य कामगार आयुक्तालयाने केंद्रीय कामगार विभागाशी संपर्क साधला आहे.माझगाव डॉक व्यवस्थापनाने केंद्रीय कामगार विभागाला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला मिळणारे कार्यादेश आणि त्यानुसार उपलब्ध कामाचा व्याप यांच्याशी फिक्स्ड टर्म कामगारांची नियुक्ती जोडलेली आहे.

कंपनीच्या कामकाजाच्या आवश्यकतेनुसार या कामगारांची नियुक्ती केली जाते, त्यानुसार कामगारांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगत कामगार मंत्री म्हणाले, कंपनीला सध्या नवीन कार्यादेश प्राप्त झालेले नसल्यामुळे फिक्स्ड टर्म कामगारांची नवीन भरती प्रस्तावित नसल्याचे निदर्शनास येत आहे. भविष्यात नवीन कार्यादेश मिळाल्यास कंपनीची आवश्यकता आणि कामाचा व्याप विचारात घेऊन भरती केली जाऊ शकते. लागू भरती निकषांनुसार उमेदवारांचा विचार करताना जहाजबांधणी क्षेत्रातील संबंधित अनुभवाला योग्य महत्त्व दिले जाईल, यासाठी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

फिक्स्ड टर्म कामगारांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या ‘समाधान’ पोर्टलवर औद्योगिक वाद दाखल केल्यास त्याची तपासणी करून औद्योगिक संबंध संहिता, २०२० आणि त्याअंतर्गत लागू नियमांनुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले.

यावेळी कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड आणि माझगाव डॉक कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा ‘आगडोंब’! मुंबई उपनगरांत पारा ३८.२ अंशांवर

Next Post

ईएसआयसीच्या लाभ व सेवांच्या व्यापक प्रसारासाठी डिजिटल सुविधा : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

Next Post
ईएसआयसीच्या लाभ व सेवांच्या व्यापक प्रसारासाठी डिजिटल सुविधा : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

ईएसआयसीच्या लाभ व सेवांच्या व्यापक प्रसारासाठी डिजिटल सुविधा : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

नेरूळ सेक्टर सहामध्ये पावसाळीपूर्व कामे करा : महादेव पवार

घरमालकाचा टॅक्स थकीत म्हणून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखणार? आयुक्त कैलास शिंदे साहेब, विद्यार्थ्यांचा काय दोष?

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

महापौर मॅरेथॉनच्या घोषणेनंतर पालिकेची आता नियोजनाची लगीनघाई!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com