• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, October 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2026

घरमालकाचा टॅक्स थकीत म्हणून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखणार? आयुक्त कैलास शिंदे साहेब, विद्यार्थ्यांचा काय दोष?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ सेक्टर सहामध्ये पावसाळीपूर्व कामे करा : महादेव पवार

महादेव पवार यांचा संतप्त सवाल!

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : घरमालकाने मालमत्ता कर आणि पाणी बिल भरले नाही, तर त्याची शिक्षा भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना का? नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी लावण्यात आलेल्या या जाचक अटीवर शिवसैनिक महादेव पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही अट तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी आयुक्त श्री. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

आज घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत घरमालकाने कर किंवा पाणी बिल भरले नाही, तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष? थकबाकीदार घरमालकांवर कारवाई करण्याचे अधिकार महानगरपालिकेला असताना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची अडवणूक कशासाठी, असा सवाल महादेव पवार यांनी उपस्थित केला.

एकीकडे अनधिकृत बॅनर लावून लाखो रुपयांचा जाहिरात कर बुडवला जात असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे, तर दुसरीकडे शिक्षणासाठी मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना जाचक अटींचा फटका बसत आहे. मग कर बुडवणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार आणि विद्यार्थ्यांनाच नियमांच्या कचाट्यात का अडकवले जात आहे? असा संतप्त सवाल पवार यांनी केला.

महानगरपालिकेने विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन ही अट तातडीने रद्द करावी, पर्यायी कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती मंजूर करावी आणि घरमालकाच्या थकबाकीचा फटका विद्यार्थ्यांना बसू देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महादेव पवार यांचा इशारा

“घरमालकाचा कर थकीत असेल, तर घरमालकावर कारवाई करा; विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून त्यांच्या भविष्याशी खेळू नका! विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!”

Previous Post

ईएसआयसीच्या लाभ व सेवांच्या व्यापक प्रसारासाठी डिजिटल सुविधा : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

Next Post

महापौर मॅरेथॉनच्या घोषणेनंतर पालिकेची आता नियोजनाची लगीनघाई!

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

महापौर मॅरेथॉनच्या घोषणेनंतर पालिकेची आता नियोजनाची लगीनघाई!

कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यात मोफत नेत्रतपासणी शिबिर

कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यात मोफत नेत्रतपासणी शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com