• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, October 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 14, 2026

कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यात मोफत नेत्रतपासणी शिबिर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यात मोफत नेत्रतपासणी शिबिर

गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया; ५०० चष्म्यांचे मोफत वाटप
जयेश खांडगेपाटील
जुन्नर : कृषिभूषण श्री. जितेंद्र चंद्रकांत बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जुन्नर तालुक्यात मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंट फाउंडेशन, पुणे, आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल आणि माऊली आयकेअर सेंटर, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांची मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड तसेच ५०० चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांना पुन्हा स्पष्टपणे पाहता यावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तपासणीनंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची निवड करून शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

पाच ठिकाणी शिबिरांचे आयोजन

या शिबिरांचे आयोजन १५ ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, मढ; १८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, ओतूर; १९ ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, आळे; २६ ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव आणि ३० ऑक्टोबर रोजी ह.भ.प. गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम, जुन्नर येथे करण्यात आले आहे.

शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांनी रेशन कार्ड आणि आधार कार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. तसेच रक्तदाब किंवा मधुमेहावरील औषधे सुरू असल्यास ती सोबत ठेवावीत. रक्त पातळ करणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नयेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सेवाभावातून दृष्टीचा नवा प्रकाश

वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू रुग्णांना दृष्टीचा नवा प्रकाश देण्याचा हा उपक्रम आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिराची माहिती गरजू नेत्ररुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि जितेंद्र बिडवई मित्र परिवार, जुन्नर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

महापौर मॅरेथॉनच्या घोषणेनंतर पालिकेची आता नियोजनाची लगीनघाई!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com