शितल पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवरात्रोत्सवाची जल्लोष आता सर्वत्रच वाढत चालला असून सानपाडा परिसरामध्ये साईभक्त महिला फांऊडेशन व साईभक्त सेवा मंडळ आयोजित नवरात्रोत्सवाची धूम आता नवरात्रप्रेमींमध्ये आणि देवीभक्तांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
सानपाडा सेक्टर दोनमधील सौराष्ट्र पटेल हॉलशेजारी असणाऱ्या दुर्गापूजा ग्राऊंडवर गेली ८ वर्षे माथाडी नेते व अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तसेच साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवाला बेलापूरच्या स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, स्थानिक परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, रहिवाशी, महिला मंडळ आदी दरवर्षी उत्साहाने सहभागी होत असतात. दररोज नवरात्रोत्सवात दांडिया तसेच गरबा खेळायला येणाऱ्यांना वेगवेगळी पारितोषिक देण्यात येत असते. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता होमहवन व महाआरती होणार असून सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सानपाडावासियांनी या महाप्रसादामध्ये तसेच महाआरतीमध्ये मोठ्या संख्येने व भक्तीभावाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक पांडूरंग आमले यांनी केले आहे.
