• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, October 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 20, 2026

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सेवकांना १४.२५ टक्के बोनस!

adminbyadmin
in देश - विदेश
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एनडीडीसीकडून पाच हजार कोटींचे खेळते भांडवली कर्ज मंजूर

किमान ५७ हजार, तर कमाल ५ लाख ३६ हजार रुपयांचा लाभ;

आठ वर्षांत बोनसचा दर ९ टक्क्यांवरून १४.२५ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने यंदा आपल्या सेवकांना १४.२५ टक्के बोनस जाहीर करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. गेल्या आठ वर्षांत बोनसचा दर ९ टक्क्यांवरून १४.२५ टक्क्यांपर्यंत वाढला असून, बँकेच्या सेवकांना मिळणारा हा लाभ त्यांच्या कार्यक्षमतेची आणि संस्थेच्या प्रगतीतील योगदानाची पोचपावती मानला जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असून, सहा प्रादेशिक कार्यालये आणि राज्यभरातील ५४ शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे.

यंदा बँकेच्या सेवकांना किमान ५७ हजार रुपये, कमाल ५ लाख ३६ हजार रुपये, तर सरासरी ८१ हजार ५१५ रुपये बोनस मिळणार आहे. त्यामुळे सेवकांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिवाळीच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवसायवाढीची आकडेवारी लक्षवेधी आहे. पूर्वी बँकेत ३ हजार ४१५ सेवक कार्यरत असताना बँकेचा एकूण व्यवसाय ५ हजार ६१२ कोटी रुपये होता. आज सेवकांची संख्या केवळ ७७७ असतानाही बँकेचा व्यवसाय ५६ हजार कोटी रुपयांच्या पुढे पोहोचला आहे.

३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ५६ हजार २४९ कोटी रुपये झाला आहे. मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे व्यवसायाचा विस्तार साधण्यात सेवकांची कार्यक्षमता, आधुनिक कार्यपद्धती आणि व्यवस्थापनाचे नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक कर्मचाऱ्यामागे ६८ कोटी रुपयांचा व्यवसाय असल्याची आकडेवारी बँकेच्या कामकाजाचा विस्तार अधोरेखित करते.

बँकेची आर्थिक स्थिती भक्कम

३१ मार्च २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती 

  • एकूण व्यवसाय : ५६,२४९ कोटी रुपये

  • नेटवर्थ : ५,७४७ कोटी रुपये

  • स्वनिधी : ८,१७५ कोटी रुपये

  • सीआरएआर : १८.५० टक्के

  • नेट एनपीए : १.६४ टक्के

  • प्रति कर्मचारी व्यवसाय : ६८ कोटी रुपये

या आकडेवारीतून बँकेचा व्यवसायविस्तार आणि आर्थिक स्थिती स्पष्ट होते. बोनसच्या दरात सातत्याने झालेली वाढ ही संस्थेच्या प्रगतीचा लाभ सेवकांपर्यंत पोहोचविण्याच्या भूमिकेचे द्योतक आहे.

निवृत्त सेवकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य

केवळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणापुरते मर्यादित न राहता बँकेने निवृत्त सेवकांच्या आर्थिक सुरक्षिततेचाही विचार केला आहे. सन २०२४ मध्ये निवृत्त सेवकांसाठी पेन्शन योजना जाहीर करण्यात आली. त्यामुळे सेवकांच्या कार्यकाळातील योगदानाबरोबरच निवृत्तीनंतरच्या जीवनातील आर्थिक सुरक्षिततेलाही महत्त्व देण्याचा बँकेचा दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे. यंदाच्या बोनस घोषणेमुळे सेवकांच्या कुटुंबांना सणासुदीच्या खर्चासाठी आर्थिक हातभार लागणार आहे. संस्थेची प्रगती आणि सेवकांचे हित यांची सांगड घालत बोनसच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद वाटण्याचा बँकेचा निर्णय कर्मचारीवर्गासाठी दिलासादायक ठरला आहे.

Previous Post

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नेरूळच्या नवरात्र मंडळाचा पुढाकार !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com