• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, October 23, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2026

सात महिन्यांचे थकीत वेतन अदा करून दोषींवर कारवाई करा : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सात महिन्यांचे थकीत वेतन अदा करून दोषींवर कारवाई करा : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : सासवड नगरपालिकेतील २३० कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि अन्य वैधानिक लाभ मिळत आहेत किंवा नाहीत, याची विशेष चौकशी करून सात महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले आहेत.

कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत कामगार मंत्री बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय ए कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस उपस्थित होते.

कामगार मंत्री म्हणाले, सासवड नगरपालिकेत एकूण २३० कंत्राटी कामगार गेल्या २८ वर्षांपासून सेवा बजावत आहेत. कामाचे स्वरूप नियमित असूनही या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलेले नाही.
नगरपालिकेने मंजूर केलेल्या वेतनातून विविध कारणांनी सुमारे ३० ते ४० टक्के रक्कम कपात केली जात असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे.

सन २०२२ पासून अनेक कामगारांचा पीएफ नियमितपणे जमा झालेला नाही. तसेच ईएसआय, किमान वेतन, साप्ताहिक सुटी, वैधानिक लाभ मिळत नसल्याच्या ही तक्रारी आलेले आहेत. नगरपालिका ही मूळ नियोक्ता संस्था असल्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करणे ही नगरपालिकेची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने मागवावा, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.

Previous Post

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सेवकांना १४.२५ टक्के बोनस!

Next Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन महिन्यांचे मानधन देण्याकरता भाजप नगरसेवकाचा पुढाकार !

Next Post
कुकशेत गावातील महापालिका विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये तब्बल दीड तास अडकला पाणीपुरवठा कर्मचारी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन महिन्यांचे मानधन देण्याकरता भाजप नगरसेवकाचा पुढाकार !

नैना’ प्रकल्पाला अखेर गती!

नैना’ प्रकल्पाला अखेर गती!

मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन

मुंबई युवक काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार विरोधात आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com