• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, October 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 28, 2026

तळोजात उलमा बोर्डाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in पनवेल
0
तळोजात उलमा बोर्डाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांसह महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार

जीवन गव्हाणे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : तळोजा फेज-१ येथे ऑल इंडिया उलमा बोर्ड (रजि.) च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. बोर्डाचे कोअर कमिटी सदस्य हाजी शहनवाज खान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अ‍ॅड. शफी सय्यद यांच्या कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या केंद्राच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उद्घाटन सोहळ्याला समाजसेविका संगीता ठाकूर, मीनाज काझी, नजीर मनियार यांच्यासह बोर्डाचे पदाधिकारी, महिला विभागाच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोर्डाचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शफी सय्यद, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा कुलसुम शेख, नवी मुंबई विद्यार्थी विभागाच्या अध्यक्षा समिया शफी सय्यद, तळोजा वॉर्ड महिला विभागाच्या अध्यक्षा शमा खान आणि उपाध्यक्षा हसीना शेख यांची उपस्थिती होती.

नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, सामाजिक सलोखा व बंधुभाव वाढविणे, शैक्षणिक जनजागृती करणे, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि गरजू नागरिकांना सहकार्य करणे, अशा विविध उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.

उपस्थित मान्यवरांनी नवीन कार्यालयाच्या शुभारंभाबद्दल अभिनंदन करत बोर्डाच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. समाजसेवा, शिक्षण, सामाजिक एकता आणि जनहित या उद्दिष्टांसह सुरू झालेले हे कार्यालय परिसरातील नागरिकांसाठी संवादाचे आणि सामाजिक कार्याचे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, नागरिक आणि पत्रकारांचे आभार मानण्यात आले.

Previous Post

मंत्री नितेश राणेंचा ससून गोदीतील महिला मच्छीमारांसाठी सुरक्षा किटचा पुढाकार

Next Post

नवी मुंबई जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को, क्राईस्ट अकॅडमी, फा. ॲग्नलचे वर्चस्व

Next Post
नवी मुंबई जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को, क्राईस्ट अकॅडमी, फा. ॲग्नलचे वर्चस्व

नवी मुंबई जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को, क्राईस्ट अकॅडमी, फा. ॲग्नलचे वर्चस्व

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com