• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, October 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 28, 2026

मंत्री नितेश राणेंचा ससून गोदीतील महिला मच्छीमारांसाठी सुरक्षा किटचा पुढाकार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दुष्काळावर मात करण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबवा!

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छीमार महिलांना ग्लोव्हज, शूज, हेड गिअर, फिंगर कॉटन व मास्कचे वाटप

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ससून गोदी येथील महिला मच्छीमार भगिनींच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ससून गोदीतील महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात येणार आहे. या सुरक्षा किट वाटपाचा भव्य समारंभ उद्या बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता, नेट मेंडिंग हॉल, राष्ट्रीय मत्स्यकी सर्वेक्षण इमारत, ससून गोदी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सुरक्षा किटमध्ये ग्लोव्हज, शूज, हेड गिअर, फिंगर कॉटन आणि मास्क यांचा समावेश आहे. मत्स्य व्यवसायातील दैनंदिन कामकाजादरम्यान महिलांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आमदार चित्रा वाघ, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव श्री.एन.रामास्वामी, मत्स्यआयुक्त श्री.भानुदास पालवे तसेच राष्ट्रीय मत्स्यकी सर्वेक्षणचे संचालक डॉ.श्रीनाथ के.आर. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मत्स्य क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मच्छीमार बांधवांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देतानाच मच्छीमारांच्या आरोग्य व सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात येत आहे.

Previous Post

साखर कामगारांच्या मागण्यांसाठी उच्चस्तरीय बैठक; बेमुदत संप स्थगित

Next Post

तळोजात उलमा बोर्डाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Next Post
तळोजात उलमा बोर्डाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

तळोजात उलमा बोर्डाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को, क्राईस्ट अकॅडमी, फा. ॲग्नलचे वर्चस्व

नवी मुंबई जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को, क्राईस्ट अकॅडमी, फा. ॲग्नलचे वर्चस्व

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com