• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2026

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

जीवन गव्हाणे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सेक्टर २६, करावे-नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानावर १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित चार दिवसीय ‘हिरकणी महोत्सव २०२६’ ला नवी मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला बचत गट व संस्थांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. अशा प्रकारची सात दिवसांची प्रदर्शने वर्षातून किमान तीन वेळा विविध भागांत आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महापौर सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार यांच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवासाठी सुरुवातीला १५० स्टॉल्सची तयारी करण्यात आली होती; मात्र महिलांच्या उत्साही प्रतिसादामुळे २७५ स्टॉल्स उभारावे लागले. याशिवाय २१ खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही नागरिकांचे आकर्षण ठरले आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी येथे उटणे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळी, हस्तकला, फराळ, साड्या, ड्रेस मटेरिअल, दागिने यांसह ईटीसी दिव्यांग शिक्षण-प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचीही विक्री सुरू आहे. महापौर सुजाता पाटील यांनी दुष्काळग्रस्तांसाठी स्वेच्छा मदतनिधी देण्याचे आवाहन केले.

या महोत्सवात दीपसंध्या-गंगा आरती, महिलांची गायन-वादन-नृत्य स्पर्धा, मंगळागौर, ‘होम मिनिस्टर’ आणि समारोप सोहळ्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वनमंत्री गणेश नाईक, महापौर सुजाता पाटील, सभागृह नेते सागर नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, उपसभापती रूपाली भगत, ‘क’ प्रभाग समिती अध्यक्षा शैला पाटील, क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेविका नेत्रा शिर्के, स्वप्ना गावडे, स्वाती गुरखे, सुरेखा नरबागे, रेखा म्हात्रे, मिरा पाटील, भारती कोळी, संतोषी म्हात्रे, डॉ. प्रणाली पाटील, शिल्पा ठाकूर, शशिकला औटी, रेश्मा मढवी, मिनाक्षी पाटील, प्रिती भोपी, विशाल विचारे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, निर्मला गावडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, उपआयुक्त (मालमत्ताकर) डॉ. अमोल पालवे, समाजविकास उपआयुक्त प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

Previous Post

महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

Next Post

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

Next Post
गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com