• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2026

महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने भव्य बचतगट दीपावली महोत्सव २०२६

आमदार नीलेश राणे यांची उपस्थिती

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

कणकवली : महिला बचतगटांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. महिलांच्या कौशल्याला आणि कष्टांना व्यासपीठ मिळवून देणारा शिवसेनेचा बचतगट दीपावली महोत्सव हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी केले.

शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने आयोजित भव्य बचतगट दीपावली महोत्सव २०२६ ला आमदार नीलेश राणे यांनी भेट देत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी महिला बचतगटांच्या उपक्रमांची माहिती घेतली. बचतगटांच्या माध्यमातून महिला विविध प्रकारची उत्पादने तयार करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा महिलांना प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. या महोत्सवामुळे महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, तालुकाप्रमुख मंगेश गुरव, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके, युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे, गुरुप्रसाद शिंदे, सुहास राऊत, मंगेश ब्रह्मदंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला बचतगटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ देणाऱ्या या महोत्सवाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous Post

जुन्नरमध्ये नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

Next Post
हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com