• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2026

जुन्नरमध्ये नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
जुन्नरमध्ये नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

२०६ नागरिकांची तपासणी, ५२ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

१०० गरजूंना मोफत चष्मेवाटप

तीन वर्षांत २५० हून अधिक शिबिरांच्या माध्यमातून आठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना नवी दृष्टी

जुन्नर : आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना नेत्रोपचार घेणे शक्य होत नाही. अशा गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी ह.भ.प. गुरुवर्य कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २०६ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५२ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच १०० गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

नेत्रतपासणीसोबतच श्री हॉस्पिटल, आळेफाटा यांच्या माध्यमातून हृदयरोग, मूत्ररोग तसेच अन्य आवश्यक आरोग्यविषयक तपासण्याही करण्यात आल्या. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना पनवेल येथील रुग्णालयात नेण्या-आणण्याची व्यवस्था, निवास, नाश्ता, भोजन, चष्मे आणि आवश्यक औषधे या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

जुन्नर तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून डिसेंट फाउंडेशन आणि शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सातत्याने मोफत नेत्रआरोग्य सेवा राबवली जात आहे. या उपक्रमाची माहिती देताना डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील सावरगाव, जुन्नर, मढ, ओतूर, आळेफाटा आणि नारायणगाव यांसह विविध ठिकाणी आतापर्यंत २५० हून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आठ हजारांहून अधिक नेत्ररुग्णांना पुन्हा नवी दृष्टी मिळाली आहे.

‘एकही गरजू अंधारात राहू नये’ हा या उपक्रमामागील मुख्य संकल्प असून, केवळ जुन्नर तालुकाच नव्हे, तर आसपासच्या तालुक्यांतील नागरिकही या शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घेत असल्याचे बिडवई यांनी सांगितले.

शिबिराच्या प्रसंगी ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास दरेकर, पंचायत समिती सदस्य संजय वऱ्हाडी, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. एफ. बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, कोंडाजीबाबा डेरे आश्रमाचे अध्यक्ष किसन मेहेर, कृषी अधिकारी रवींद्र वाडकर, पांडुरंग तोडकर, दीपक कोकणे, अजित भोर, बाळकृष्ण बांगर, अजिंक्य घोलप, भरत जाधव आणि प्रा. शरद मनसुख उपस्थित होते.

शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व वैद्यकीय पथक, श्री हॉस्पिटल आळेफाटाचे कृष्णा रोकडे व वैद्यकीय पथक, माऊली आय केअर सेंटरचे विलास बोंद्रे, वेदांत पडघम, समन्वयक योगेश वाघचौरे, श्रावण घोगरे, आशा सेविका, परिचारिका तसेच स्थानिक नागरिकांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले.

गरजू रुग्णांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया आणि चष्म्यांच्या माध्यमातून दृष्टीचा नवा प्रकाश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक व लाभार्थ्यांनी कौतुक केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानण्यात आले.

Previous Post

अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी कर्जतमध्ये उभारणार ‘अनंत आश्रय’

Next Post

महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

Next Post
महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

गड-किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होण्याचे मैत्री फाउंडेशनचे आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com