• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 2, 2026

अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी कर्जतमध्ये उभारणार ‘अनंत आश्रय’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी कर्जतमध्ये उभारणार ‘अनंत आश्रय’

१०० एकरांवर ५ हजार जणांना आयुष्यभराचा निवारा!

नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून साकार होणार अनोखी वसाहत

निवासासह आरोग्यसेवा, शिक्षण, पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभर सन्मानाने, सुरक्षितपणे आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत येथे ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ ही भव्य वसाहत उभारण्यात येणार आहे. तब्बल १०० एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पात सुमारे पाच हजार गरजू व्यक्तींना आयुष्यभरासाठी हक्काचा निवारा मिळणार आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले.

केवळ निवारा देणे एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून, अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम, माया, वैद्यकीय सुविधा आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आधार मिळावा, अशी या प्रकल्पाची संकल्पना आहे. ना-नफा तत्त्वावर कायमस्वरूपी कार्यरत राहणारी ही संस्था सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून टप्प्याटप्प्याने विकसित केली जाणार आहे.

‘प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला प्रेम, सहानुभूती आणि योग्य देखभाल मिळाली पाहिजे,’ या विचारातून अनंत आश्रयाची उभारणी करण्यात येत असल्याचे नीता अंबानी यांनी सांगितले. हा प्रकल्प माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या हृदयाच्या जवळचा आहे. ज्यांना घराची, काळजीची आणि सुरक्षिततेची गरज आहे, अशा व्यक्तींसाठी प्रेमळ आणि आपलेपणाचे वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेषतः दिव्यांग मुलांच्या भवितव्याबाबत चिंतेत असलेल्या पालकांसाठी हा प्रकल्प मोठा आधार ठरणार आहे. आपल्या पश्चात मुलांची काळजी कोण घेणार, हा प्रश्न अनेक पालकांना सतावत असतो. मात्र, आपल्या मुलांना आयुष्यभरासाठी सुरक्षित घर आणि कुटुंबासारखी माणसे मिळतील, ही भावना पालकांना दिलासा देणारी ठरेल, असेही नीता अंबानी यांनी नमूद केले.

घरापासून दूर असलेले आपलेपणाचे घर!

अनंत आश्रय ही केवळ निवासी संस्था नसून, एक मोठे कुटुंब म्हणून विकसित केली जाणार आहे. येथे राहणाऱ्या व्यक्तींना रुग्ण म्हणून नव्हे, तर समाजाचा समान घटक आणि शेजारी म्हणून वागणूक दिली जाणार आहे. या वसाहतीत निवासी घरे, रस्ते, मंदिरे, रुग्णालय, क्रीडांगणे, उद्याने, कार्यशाळा आणि विविध सामुदायिक सुविधा उपलब्ध असतील.

वसाहतीत आठ स्वतंत्र निवासी गावे उभारली जाणार असून, त्यांना देशातील पवित्र नद्यांची नावे दिली जातील. प्रत्येक गावाला स्वतंत्र रंगसंगती, बोधचिन्ह आणि वैशिष्ट्यपूर्ण उद्याने असतील. त्यामुळे रहिवाशांना आपले निवासस्थान सहज ओळखता येईल आणि स्वतंत्रपणे वावरता येईल.

प्रत्येक रहिवाशासाठी त्याच्या वैयक्तिक गरजा, आरोग्यस्थिती आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन काळजी व विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे. यामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, मैत्री आणि स्वावलंबनाचा समावेश असेल. या आराखड्याचा दर सहा महिन्यांनी आढावा घेऊन आवश्यक बदल केले जाणार आहेत. प्रत्येकाला स्वतःची खोली, आवडीनुसार सजावट आणि वैयक्तिक ओळख जपण्याची संधी दिली जाणार आहे.

आरोग्यापासून रोजगारापर्यंत सर्वंकष सुविधा

अनंत आश्रयमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले विशेष रुग्णालय उभारले जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण उपचारांसह दंतवैद्यकीय सेवा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपचार उपलब्ध असतील. तसेच फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, हायड्रोथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीसारख्या पुनर्वसन सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत.

रहिवाशांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संगीत, कला, क्रीडा आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा उपलब्ध असतील. शिक्षणासाठी सर्वसमावेशक व्यवस्था, व्यवसाय प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबविले जातील. बेकरी उत्पादने, हॉटेल व्यवसाय आणि हस्तकला निर्मिती यांसारख्या क्षेत्रांत कौशल्य विकसित करून रोजगार मिळवण्याची संधी दिली जाणार आहे.

याशिवाय वनतारा येथील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने प्राणी निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. पशुपक्ष्यांच्या सहवासातून रहिवाशांना आनंद आणि भावनिक आपलेपणाचा अनुभव मिळावा, हा त्यामागील हेतू आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीही स्थापन केली जाणार आहे.

परिसरातील गावांनाही मिळणार लाभ

अनंत आश्रय ही वसाहत परिसरापासून वेगळी न राहता स्थानिक समाजाशी जोडलेली असेल. येथील मंदिरे, रुग्णालये, क्रीडांगणे आणि अन्य सुविधांचा लाभ आसपासच्या गावांतील सुमारे एक हजार नागरिकांनाही घेता येणार आहे. परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. तसेच वसतिगृहे आणि फिरती वैद्यकीय केंद्रे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आसपासच्या गावांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवली जाणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पात सुमारे पाच हजार रहिवाशांसह त्यांची काळजी घेणारे कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक, सेवक आणि कुटुंबीय अशा एकूण १५ हजार लोकांचा समावेश असलेला मोठा समुदाय विकसित होण्याची अपेक्षा आहे.

सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, एपिलेप्सी यांसारख्या गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या आणि सातत्याने वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असलेल्या व्यक्तींनाही येथे विशेष सुविधा मिळणार आहेत.

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या, एकाकी जीवन जगणाऱ्या आणि आयुष्यभर आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षितता, सन्मान आणि स्वावलंबनाची संधी देण्याच्या दृष्टीने ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्येकाला आपलेपणाचे घर, माणुसकीचा आधार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे.

Previous Post

अंधारलेल्या डोळ्यांना मिळणार प्रकाशाची नवी दिशा !

Next Post

जुन्नरमध्ये नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
जुन्नरमध्ये नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जुन्नरमध्ये नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा दीपावली महोत्सव कौतुकास्पद : आमदार नीलेश राणे

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

हिरकणी महोत्सवाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० ऐवजी २७५ स्टॉल्स उभारावे लागले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com