• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, November 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2026

शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

ब्रॉन्कायटिस आणि छातीतील संसर्गावरील उपचारांना यश; पुढील उपचार घरीच सुरू राहणार

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. पुढील उपचार आणि औषधोपचार घरीच सुरू राहणार आहेत.

शरद पवार यांना खोकला, ब्रॉन्कायटिसचा त्रास आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे ४ नोव्हेंबर रोजी पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. प्रतीत समदानी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.

डिस्चार्जबाबत माहिती देताना डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले की, शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास आणि छातीत संसर्ग झाला होता. आता त्यात सुधारणा झाली आहे. पुढील उपचार घरीच सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शरद पवार यांचे वय लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना औषधोपचारांसोबतच विश्रांती आणि काही अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी परतणार आहेत.

Previous Post

नवी मुंबईत महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेचा शिवमय जागर!

Next Post

फटाक्यांचा निष्काळजीपणा टाळा; सुरक्षित दिवाळीसाठी अग्निशमन दलाची विशेष मोहीम!

Next Post
फटाक्यांचा निष्काळजीपणा टाळा; सुरक्षित दिवाळीसाठी अग्निशमन दलाची विशेष मोहीम!

फटाक्यांचा निष्काळजीपणा टाळा; सुरक्षित दिवाळीसाठी अग्निशमन दलाची विशेष मोहीम!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com