स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : “आगरी-कोळी समाजावर माझे नितांत प्रेम आहे. मच्छीमारांना सरकारदरबारी सुविधा मिळतात, पण त्यासाठी एकत्र येऊन सुविधा मिळवायला हव्यात. लांगेश्वराच्या कृपेने आणि मुर्बा गणपतीमुळे मोरावे गावाचे नाव सुप्रसिद्ध होत आहे. मोरावे गावासाठी सिडकोकडून मी अधिकृत मैदान मिळवून दिले आहे. आता समाज मंदिर आणि इतर विकासकामांचा पाठपुरावा सुरू आहे. मोरावे ग्रामस्थ एकजुटीने राहिले तर त्यांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. जेटीचे काम मार्गी लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आता जोर लावला पाहिजे. गावच्या विकासासाठी हातात हात घालून काम करायला तयार असाल तर मी तुमच्या मागे कायम आहे,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत मोरावे येथे मच्छीमार सोसायटीच्या नामफलक अनावरणप्रसंगी म्हणाले.
मोरावे येथे आई जरी मरी पारंपारिक व्यावसायिक मच्छीमार सहकारी संस्थेच्या नामफलकाचे अनावरण आंतराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १०) करण्यात आले. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, जरी मरी पारंपारिक मच्छीमार व्यावसायिक सहकारी संस्थेचे चेअरमन उत्तम कोळी, सचिव रितेश म्हात्रे, खजिनदार प्रवीण पाटील आणि पदाधिकारी, तसेच मोरावे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

