नगरसेवक रविंद्र इथापे यांच्या हस्ते चेकर टाइल्स बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन
सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : भिमाशंकर सोसायटीमधील ए टाईप आणि बी टाईप इमारतींच्या दरम्यान असलेल्या अंतर्गत रस्त्यांवर चेकर टाइल्स बसविणे तसेच रस्त्यांची सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक रविंद्र इथापे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर होऊन नागरिकांना अधिक सुकर आणि सुरक्षित ये-जा करता येणार आहे.
या शुभारंभप्रसंगी भिमाशंकर सोसायटीचे अध्यक्ष रमेश पवार, माजी सचिव संजय चव्हाण, संचालक रंगराव पाटील, अशोकशेठ हिंगे, डी. जी. पाटील, भीमराव सूर्यवंशी, राजेंद्र खिलारी, केशव काका नलावडे, मधुकर बोबडे, योजना नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ए टाईप आणि बी टाईपमधील नागरिक सुनील डुंबरे, सुमित चव्हाण, सुरेश बामणे, कदम, शामकांत नेहरकर, डी. एम. तांबोळी, प्रमिला नाईकरे, सुनीता गावडे, काशीद यांच्यासह सोसायटीचे व्यवस्थापक प्रकाश राव, कामाचे ठेकेदार आगे आणि इतर नागरिक उपस्थित होते.
सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा झाल्यामुळे रहिवाशांना दैनंदिन प्रवासात दिलासा मिळणार असून परिसराच्या सुशोभीकरणालाही हातभार लागणार आहे. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विकासकामांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.