• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, November 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 20, 2026

कार्तिकी यात्रेसाठी पंढरी नगरी गजबजली

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कार्तिकी यात्रेसाठी पंढरी नगरी गजबजली

४ लाख भाविकांची मांदियाळी ; गोपाळपूरच्यापुढे दर्शन रांग; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पहाटे सपत्नीक करणार श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

सूर्यकांत आसबे

सोलापूर : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत कार्तिकी यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी पंढरीत दाखल झाली असून, भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण पंढरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. यात्रेसाठी शुक्रवार सायंकाळपर्यंत सुमारे ४ लाख भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्ते, मठ, धर्मशाळा आणि भक्तनिवास भाविकांनी गजबजून गेले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे  पोहोचली आहे. ‘विठ्ठल-विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ अशा जयघोषाने चंद्रभागेचा परिसर दुमदुमून गेला आहे. अनेक भाविक कुटुंबासह पंढरीत दाखल झाले असून, चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.

 ————————-

 उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा

कार्तिकी शुद्ध एकादशीचा मुख्य धार्मिक सोहळा शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी हा पूजाविधी पार पडणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. यावेळी मानाच्या वारकरी दाम्पत्यालाही महापूजेचा मान मिळणार आहे.

————————

भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत  पत्राशेड उभारण्यात आले असून, पिण्याचे शुद्ध पाणी, चहा, नाश्ता, विश्रांतीची ठिकाणे, पंखे, कुलर आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सुमारे दोन हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर आणि आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. चंद्रभागा नदीच्या घाटांवर जीवरक्षक आणि आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.

———————–

विठ्ठलनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली

कार्तिकी यात्रेमुळे पंढरपूरमध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील भाविक टाळ-मृदंगाच्या गजरात विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करत आहेत.यंदा कार्तिकी यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून, मुख्य एकादशीच्या दिवशी गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीने पंढरी नगरीला जणू भक्तीचा महासागर फुलला आहे.

————————

पदस्पर्श दर्शनासाठी १२ तासांचा अवधी

कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या तसेच खाजगी वाहनांमधून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत .भाविकांच्या गर्दीने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेच्या  पैलतीरावरील ६५ एकर भक्तीसागर परिसरातील ७२५ प्लॉट पैकी ३५० प्लॉटचे वाटप झाले आहे. सोबत आलेले सुमारे दीड लाखाहून अधिक भाविक तंबू आणि राहुट्यामध्ये मुक्कामाला आहेत .रिद्धी -सिद्धी दर्शन मंडप परिसरात कायमस्वरूपी दर्शन हॉलचे बांधकाम सुरू असल्यामुळे मंदिर समितीने गोपाळपुर –  स्वेरी कॉलेज रस्त्यावरील खाजगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात १५ पत्रा शेड उभारून भाविकांना दर्शन रांगेची व्यवस्था करून दिली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी दहा ते बारा तासांचा अवधी लागत आहे.

Previous Post

भिमाशंकर सोसायटीतील रस्त्यांच्या सुधारणेला प्रारंभ

Next Post

अकलूजच्या घोडे बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल

Next Post
अकलूजच्या घोडे बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल

अकलूजच्या घोडे बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com