• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, November 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 22, 2026

पिंपळगावच्या कस्तुरी चव्हाणची राष्ट्रीय भरारी!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पिंपळगावच्या कस्तुरी चव्हाणची राष्ट्रीय भरारी!

हर्डल्समध्ये नवा विक्रम; सुवर्णपदकाला गवसणी

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : जिद्द, मेहनत आणि कठोर सरावाच्या जोरावर पिंपळगाव तर्फे नारायणगावच्या कस्तुरी संदीप चव्हाण हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णकामगिरी करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिवपुरी (मध्य प्रदेश) येथे झालेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कस्तुरीने १७ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर हर्डल्स प्रकारात सुवर्णपदक पटकावण्यासह नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

कस्तुरीने अवघ्या १३.५९ सेकंदांत १०० मीटर हर्डल्सचे अंतर पूर्ण केले. यासह रिद्धी संतोष माने हिचा १४.३८ सेकंदांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत तिने नवा विक्रम आपल्या नावावर केला. गुरुवर्य रा. प. सबनीस विद्या मंदिरमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या कस्तुरीच्या या देदीप्यमान यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नोव्हेंबर २०२६ मध्ये बोईसर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कस्तुरीने द्वितीय क्रमांक मिळवला होता. या कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि राष्ट्रीय स्तरावर तिने सुवर्णपदकासह विक्रमाची नोंद केली.

या यशाबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विश्वस्त प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, क्रीडा समितीचे प्रमुख डॉ. संदीप डोळे तसेच प्रशिक्षक तुळशीदास कोऱ्हाळे  आणि पिंपळगावच्या ग्रामस्थांनी कस्तुरी चव्हाणचे अभिनंदन केले.

“शिक्षक, संस्थाचालक, आई-वडील आणि प्रशिक्षक तुळशीदास कोऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनामुळेच राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक पटकावणे शक्य झाले,” अशी कृतज्ञ भावना कस्तुरीने व्यक्त केली.

कस्तुरीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे नारायणगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आपल्या कामगिरीने राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालत कस्तुरीने पिंपळगावच्या नावाची क्रिडा क्षेत्रालाही दखल घ्यायला लावली असल्याची कौतुकाची थाप पिंपळगावच्या ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

Previous Post

‘सिरीयल किलर’ नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

शनिवारी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ मेळा

Next Post
शनिवारी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ मेळा

शनिवारी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा 'एक दिवस कायस्थांचा' मेळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com