• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, November 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 22, 2026

‘सिरीयल किलर’ नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

adminbyadmin
in मुंबई
0
‘सिरीयल किलर’ नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

मुंबई : मराठी रंगभूमीवर आपल्या वेगळ्या कथानकाने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविणाऱ्या ‘सिरीयल किलर’ या नाटकाने १०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. दादर येथील ऐतिहासिक शिवाजी मंदिर येथे या शतकमहोत्सवी प्रयोगाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सिंधूसंकल्प एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत आणि प्रणय तेली निर्मित या नाटकाने आपल्या दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. १०० प्रयोगांचा टप्पा गाठणे ही संपूर्ण नाट्यसंघासाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

एखादे नाटक शंभर प्रयोगांचा टप्पा यशस्वीपणे गाठते, त्यामागे कलाकारांचा कसदार अभिनय, दिग्दर्शकाचे कल्पक मार्गदर्शन, निर्मात्यांची मेहनत आणि पडद्यामागे कार्यरत असलेल्या प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते. अशा कलाकृतींमुळे मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा अधिक बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी नाटकाचे दिग्दर्शक केदार देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह संपूर्ण नाट्यसंघाची भेट घेऊन नितेश राणे यांनी त्यांच्या अभिनयाचे आणि कलात्मक योगदानाचे कौतुक केले.

शतकमहोत्सवी प्रयोगानिमित्त संपूर्ण नाट्यसंघाचे अभिनंदन करताना त्यांनी नाटकाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि आगामी प्रयोगांसाठी शुभेच्छा दिल्या. मराठी रंगभूमीवरील अशा यशस्वी नाट्यप्रयोगांमुळे नाट्यरसिकांना दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी मिळत असल्याचे या सोहळ्याने पुन्हा अधोरेखित केले.

Previous Post

काँग्रेसची गुरुवारी ठाण्यात राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’

Next Post

पिंपळगावच्या कस्तुरी चव्हाणची राष्ट्रीय भरारी!

Next Post
पिंपळगावच्या कस्तुरी चव्हाणची राष्ट्रीय भरारी!

पिंपळगावच्या कस्तुरी चव्हाणची राष्ट्रीय भरारी!

शनिवारी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ मेळा

शनिवारी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा 'एक दिवस कायस्थांचा' मेळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com