• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, November 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 25, 2026

बांधकाम व पायाभूत सुविधा उपकरण निर्मितीसाठी केंद्राची ११ हजार कोटींची योजना मंजूर

adminbyadmin
in देश - विदेश
0
बांधकाम व पायाभूत सुविधा उपकरण निर्मितीसाठी केंद्राची ११ हजार कोटींची योजना मंजूर

देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन; भारताला जागतिक बाजारपेठेत अग्रस्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नवी दिल्ली : देशातील बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उपकरणांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ११ हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरण उत्पादन परिसंस्था वृद्धी योजना’ मंजूर करण्यात आली. या योजनेमुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यासह रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून, आत्मनिर्भर भारत अभियानालाही बळ मिळणार आहे.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक उपकरणांचे तसेच त्यांच्या सुट्या भागांचे देशांतर्गत उत्पादन वाढविणे, त्यासाठी उत्पादकांना आर्थिक प्रोत्साहन देणे आणि देशात स्वतंत्र अत्याधुनिक चाचणी केंद्र उभारणे, ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

भारताचा बांधकाम व पायाभूत सुविधा उपकरण उद्योग सध्या अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये या उद्योगाची बाजारपेठ सुमारे ९७ हजार ५०० कोटी रुपयांची होती. रस्ते, बंदरे, गृहनिर्माण आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वाढत्या विस्तारामुळे २०२९-३० पर्यंत ही बाजारपेठ दुपटीहून अधिक वाढून सुमारे २ लाख २८ हजार १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत शिप-टू-शोअर क्रेन्स, टनेल बोरिंग मशीन, हायड्रॉलिक एक्स्कॅव्हेटर्स, ऑफ-हायवे ट्रक्स यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या उत्पादनाला विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादन क्षमता आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

या योजनेत दोन प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या घटकांतर्गत पात्र मूळ उपकरण उत्पादक आणि सुटे भाग उत्पादकांना वाढीव विक्री मूल्यावर पाच वर्षांच्या कालावधीत १३ ते ८ टक्क्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.

दुसऱ्या घटकांतर्गत देशात स्वतंत्र आणि अत्याधुनिक बांधकाम व पायाभूत सुविधा उपकरण चाचणी केंद्र उभारण्यासाठी ३७५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान व्यवहार्यता तफावत निधी स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून या योजनेचा आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पहिली दोन वर्षे म्हणजे २०२६-२७ आणि २०२७-२८ या काळात उत्पादन सुविधा उभारण्यात येतील. त्यानंतर २०२८-२९ ते २०३२-३३ या पाच वर्षांच्या कालावधीत आर्थिक प्रोत्साहन वितरित केले जाईल. तर २०३३-३४ हे अंतिम वर्ष २०३२-३३ मधील वाढीव विक्रीवरील प्रोत्साहनाच्या अंतिम हिशेबासाठी राखीव असेल.

या योजनेमुळे देशातील बांधकाम व पायाभूत सुविधा उपकरण निर्मिती क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढण्याबरोबरच पुरवठा साखळी अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. रोजगारनिर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास आणि जागतिक बाजारपेठेतील भारतीय उत्पादकांची स्पर्धात्मकता वाढविण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकसित भारत @२०४७ या संकल्पनेच्या दिशेने देशाला तांत्रिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक औद्योगिक अर्थव्यवस्था बनविण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

Previous Post

जावेद अख्तर यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार शनिवारी गौरव

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १५ विशेष गाड्या

Next Post
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १५ विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १५ विशेष गाड्या

नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ शांताराम केकाण यांना मुदतवाढ

नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ शांताराम केकाण यांना मुदतवाढ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आळंदीतील आगरी समाज धर्मशाळेसाठी दोन कोटींची देणगी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आळंदीतील आगरी समाज धर्मशाळेसाठी दोन कोटींची देणगी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com