• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, November 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 25, 2026

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १५ विशेष गाड्या

adminbyadmin
in देश - विदेश
0
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १५ विशेष गाड्या

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

नागपूर, अमरावती, कोल्हापूर, कलबुर्गीहून मुंबईसाठी अतिरिक्त रेल्वे सेवा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ विशेष अनारक्षित गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कलबुर्गी यांसह विविध शहरांतून मुंबईसाठी या अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून मुंबईत येणाऱ्या अनुयायांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

नागपूर-मुंबईदरम्यान आठ विशेष फेऱ्या

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान चार आणि मुंबईहून नागपूरकडे चार अशा एकूण आठ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

नागपूरहून ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० आणि रात्री ११.५५ वाजता, तर ५ डिसेंबर रोजी सकाळी ७.४० आणि सायंकाळी ६.१० वाजता विशेष गाड्या सुटतील.

मुंबईहून नागपूरसाठी ६ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ वाजता, ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० आणि दुपारी १२.३५ वाजता, तर ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता विशेष गाड्या रवाना होतील.

या गाड्यांना दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी यांसह मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे असतील.

दादर-नागपूर विशेष गाडी

७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता दादरहून नागपूरसाठी एक विशेष गाडी सुटणार आहे. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा यांसह प्रमुख स्थानकांवर थांबे असतील.

कलबुर्गी, अमरावती आणि कोल्हापूरसाठीही विशेष सेवा

कलबुर्गी ते मुंबई आणि मुंबई ते कलबुर्गी अशा दोन विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता कलबुर्गीहून गाडी सुटेल. ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून कलबुर्गीसाठी परतीची गाडी रवाना होईल. या गाड्यांना पुणे, दौंड, सोलापूर, लोणावळा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील.

अमरावती-मुंबईदरम्यानही दोन विशेष फेऱ्या असतील. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता अमरावतीहून गाडी सुटेल, तर ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता मुंबईहून अमरावतीसाठी गाडी रवाना होईल. या गाड्यांना बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड आणि कल्याण येथे थांबे असतील.

कोल्हापूर-मुंबई मार्गावरही दोन विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता कोल्हापूरहून गाडी सुटेल. तर ६ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मुंबईहून कोल्हापूरसाठी परतीची गाडी रवाना होईल. या गाड्यांना हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील.

तिकिटे कुठे मिळणार?

या सर्व विशेष गाड्या अनारक्षित स्वरूपाच्या असल्याने प्रवाशांना सामान्य दराने तिकिटे काढता येतील. तिकिटांसाठी रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्या किंवा यूटीएस प्रणालीचा वापर करता येईल.

गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲपचा वापर करावा, असे मध्य रेल्वेने कळविले आहे.

Previous Post

बांधकाम व पायाभूत सुविधा उपकरण निर्मितीसाठी केंद्राची ११ हजार कोटींची योजना मंजूर

Next Post

नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ शांताराम केकाण यांना मुदतवाढ

Next Post
नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ शांताराम केकाण यांना मुदतवाढ

नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ शांताराम केकाण यांना मुदतवाढ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आळंदीतील आगरी समाज धर्मशाळेसाठी दोन कोटींची देणगी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून आळंदीतील आगरी समाज धर्मशाळेसाठी दोन कोटींची देणगी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com