• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, November 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2026

वनप्रश्नांवर नाईक-बालदींची बैठक!

adminbyadmin
in रायगड
0
वनप्रश्नांवर नाईक-बालदींची बैठक!

नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

पनवेल : पनवेल आणि खालापूर तालुक्यांतील वनविभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेऊन महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत वनजमिनीचे प्रश्न, विकासकामांना आवश्यक परवानग्या, दरडग्रस्त वाड्यांचे स्थलांतर तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

खालापूर तालुक्यातील मौजे हाश्याचीपाडी येथील वाडीचा वनसंवर्धन अधिनियमांतर्गत (एफ.सी.ए.) प्रस्ताव मंजूर करणे, तसेच मौजे चौक येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) जागेवर परवानगी देण्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.

पनवेल तालुक्यातील मौजे डोंगरीचीवाडी-गुंडसे येथील दरडग्रस्त वाडीतील नागरिकांचे दळी जमिनीवर स्थलांतर करणे, मौजे धेरवाडी येथील गावठाणाची जागा स्थलांतरित करणे, तसेच मौजे मोरबीमाळ (सवणे) येथील धरणासंदर्भातील दावा मंजूर करून तेथे मूलभूत सुविधा निर्माण करण्यास परवानगी देणे, अशा महत्त्वपूर्ण विषयांकडेही आमदार महेश बालदी यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधले.

या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. संबंधित प्रस्तावांचा पाठपुरावा करून वनविभागाच्या परवानग्यांअभावी रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

पनवेल आणि खालापूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना या बैठकीमुळे पुन्हा चालना मिळाली आहे. वनजमिनीशी संबंधित तांत्रिक अडथळे दूर करून नागरिकांचे स्थलांतर, ग्रामपंचायत कार्यालये आणि पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागणार का, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

सिडकोच्या ८,०८१ घरांची संगणकीय सोडत; ५,४२४ जणांचे स्वप्न साकार होणार!

Next Post

हिंगोली ते मुंबई; शिंदेसेनेला धक्के!

Next Post
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष : – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंगोली ते मुंबई; शिंदेसेनेला धक्के!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com