* आ.संदीप नाईक यांनी घेतलेला आढावा
* आपत्कालीन परिस्थितीत सहकार्याचचे आवाहन
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आ.संदीप नाईक यांची अधिकारीस्तरावर काही महिन्यांपासून बैठका घेऊन चर्चा केली होती. त्या अनुषंगाने शहरातील सांडपाणी वाहून नेणार्या महत्त्वाच्या मोठया नाल्याच्या स्वच्छतेचा आढावा भेट देऊन केला. या पाहणी दौर्यात पालिका प्रशासनामार्फत ८० टक्के काम पूर्ण झाल्याबाबत आ.नाईक समाधानी आहेत. झोपडपट्टीचा भाग म्हणून ओळखल्या जाणार्या दिघा परिसराने साफ सफाईने कात टाकल्याबद्दल आ.नाईक यांनी कौतुक करत पावसाळ्यात जर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तरी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत नागरिकांनी त्यावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबईकरांना केले आहे.
आ.संदीप नाईक यांनी आज गणपती पाडा, मुकुंद कंपनी परिसर, विष्णुनगर, दिघा परिसर, सुभाषनगर, ऐरोली सेक्टर-३, ५, गोठीवली गाव, घणसोली गाव, घरोंदा परिसर, महापे नाका, वाशी सेक्टर-२१, कोपरखैरणे याठिकाणी असणार्या मध्यवर्ती नाल्यांची पाहणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत केली. या पाहणी दौर्यात आ.नाईक यांनी पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेली नालेसफाई, रस्त्यावर सुरु असणारी छोटया रस्त्याची कामे, कचरा पेटी व कचरा उचला, कलवर्ट बांधणीची कामे, मल:निस्सारण वाहिन्यांची झालेली कामे या महत्त्वाच्या विषयांचा आढावा
घेतला.
प्रभाग-१ मधील मुकुंद कंपनी परिसरातील नाला तुंबल्याने मागील वर्षात याठिकाणी पाणी साचले होते. यंदाही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी हा नाला तळापासून साफ करण्याचे पालिका अधिकार्यांना सूचित केले. तर दिघा आंबेडकर नगर परिसरातील नाल्याची बांधणी करण्यात न आल्याने येथील घरामध्ये पावसाचे पाणी शिरते. त्याठिकाणी देखील तात्पुरत्या स्वरुपात गटार खोदून पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगितले. आंबेडकरनगर येथे विशेष निधीतून पावसाळ्यानंतर गटारे बांधण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे सांगितले.
दिघा परिसरातील विष्णुनगर भागात दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरुन वाहत येणारे पाणी येथील नाल्यात येत होते. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरत होते. ही बाब लक्षात घेता आ.नाईक यांनी मागील वर्षी आमदार निधीतून १० लाख रुपये खर्चून नाल्याची सक्षम बांधणी केल्याने ही समस्या मिटली होती. आ.नाईक यांनी ठिकाणी देखील पाहणी करुन या नाल्याला घरातील छोटे नाले जोडून इतर ठिकाणचा पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याच्या संदर्भात अहवाल तयार करण्याचे सांगितले.
ऐरोली परिसरातील काही ठिकाणची नाल्याची साफसफाई झाली आहे. मात्र स्टेशन परिसरात साफसफाई योग्य झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणल्यानंतर अधिकार्यांना तात्काळ सफाई मोहीम हाती घेण्याचे सांगितले. तर ऐरोली सेक्टर परिसरात काही ठिकाणी कचरा साचणे, रस्त्याची अपुरी कामे, डेब्रिज यामुळे शहराला बकालपणा येत असल्याबद्दल प्रभाग अधिकारी गायकवाड यांना चांगलेच धारेवर धरले. येत्या चार दिवसात ऐरोलीतील सर्व समस्यांची पूर्तता करण्याचे सक्त आदेश यावेळी आ.नाईक यांनी दिले.
झपाट्याने विकसित होत असलेल्या रबाळे, गोठीवली, रबाळे गाव, घणसोली येथील रस्त्याची कामे तसेच आवश्यक ठिकाणी कलवर्ट बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.नाईक यांनी सांगितले.घणसोली घरोंदा येथील नाल्याची सफाई अंतिम टप्प्यात आली असून याचा देखील आढावा त्याचबरोबर कोपरखैरणे ब्लू डायमंड हॉटेल येथील नाल्याच्या सफाईचा आढावा आ.संदीप नाईक यांनी घेतला.
पाहणी दौर्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ.नाईक म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यापासून प्रभागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी सातत्याने सिडको, पालिका, एमआयडीसी आणि शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल समाधान आहे.