नवी मुंबई : शिवसेना नवी मुंबई व राजा शिवराय प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीमध्ये ११ जुलै रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात रोजगार मिळावा यासाठी आजपर्यत १० हजाराहून अधिक बेरोजगारांनी नावनोंदणी केली आहे. शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख व कामगार नेते ऍड. मनोहर गायखे यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात सर्वाधिक सहभाग आयटी कंपन्यांचा सहभाग राहणार असल्याने सुशिक्षित बेरोजगारांना चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळणार असल्याचा आशावाद ऍड.मनोहर गायखे यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. बेरोजगार मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात आली असून ठिकठिकाणी बेरोजगार मेळाव्याचे होर्डिगही लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणच्या शाखाप्रमुखांनी व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनीदेखील स्वखर्चाने यावेळी बेरोजगार मेळाव्याचे होर्डिग लावले आहेत.
ऍड. मनोहर गायखेंच्या रोजगार मेळाव्याचे नवी मुंबईतील बेरोजगारांना सतत आकर्षण राहीलेले आहे. ऍड. गायखेंनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात रोजगार तर मिळतोच, पण उर्वरित बेरोजगारांना ऍड. गायखे वर्षभराच्या कालावधीत संघटनेच्या माध्यमातून तसेच ओळखीतून रोजगार मिळवून देण्याचा प्रयास करत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ऍड. गायखेंच्या एपीएमसीतील कार्यालयात नवी मुंबईतील सुशिक्षित बेरोजगारांची वर्दळ वाढू लागली आहे.
११ जुलै रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत चालणार्या या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी डिपलोमा होल्डर्स तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचेही ऍॅड. मनोहर गायखेंनी आयोजन केले आहे. वाशी सेक्टर ९ ए मधील बसडेपोच्या मागील बाजूस असलेल्या शिव विष्णू हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यामध्ये कॉम्प्युटर, आय.टी, ऍनिमेशन, इंजिनिअरींग, मॅनेजमेंट, बि.पी.ओ, फॉर्मास्युटिकल, बँकींग, लेबर, सिक्यरिटी, विमा आदी क्षेत्रातील नामाकिंत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती ऍॅड. मनोहर गायखे यांनी दिली.
या भव्य रोजगार मेळाव्याला तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रमास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके, शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा आदी भेट देणार आहेत.
गेल्या वर्षी आयोजित रोजगार मेळाव्यात ८३४ युवक-युवतींना त्याच दिवशी रोजगार मिळाला होता. यावर्षी एक हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा मानस राजा शिवराय प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर गायखे यांनी जाहीर केला असून रोजगार प्राप्तीसाठी बेरोजगारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
११ जुलै व १२ जुलै असे दोन दिवस सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत विद्यार्थी वर्गासाठी भव्य करिअर मार्गदर्शनासाठी एरोनॉटिकल इंजिनिअरींग, कॉम्प्युटर, आय.टी., ऍनिमेशन, यांत्रिक व अभियांत्रिकी, इलेक्ट्रीकल मॅनेजमेंट क्षेत्रातील नामाकिंतकंपन्या व त्यांचे तज्ज्ञ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कोणता कोर्स केल्यामुळे करिअरमध्ये प्रगती करता येईल व परदेशी नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्याकरीतादेखील विविध तज्ज्ञमंडळी सहभागी होणार आहेत. या मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई,पनवेल, रायगड,पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक आदी भागातील बेरोजगारांनी आपली नावनोंदणी केली आहे.