पदप्रचार फेरीला स्थानिक नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकार्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
ऐरोली / वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष व ऐरोली विधानसभा
मतदारसंघातील उमेदवार गजानन खबाले यांची प्रचार फेरी काल संध्याकाळी कोपरखैरणे सेक्टर १ ते १० या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी स्थानिक रहिवाशी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच महिला मिळून ४०० ते ५०० च्या संखेने उपस्थित राहिले. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी ठिकठिकाणी चौकाचौकात फटाके वाजून आपल्या लाडक्या उमेद्व्राचे स्वागत केले. शेकडोंच्या संखेने सहभागी झालेल्या प्रचार फेरीमुळे विरोधी पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.
सामान्य जनतेचा, स्थानिक रहिवाशांचा, सर्वच जाती धर्माच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात श्री. गजानन शामराव खबाले यांना पाठींबा मिळत आहे. खबाले साहब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, गरीबोका नेता कैसा हो,खबाले साहब जैसा हो, कोणचा म्हणतो येणार नाय,आरे आल्या शिवाय राहणार नाय,या सारख्या अनेक घोषणा देऊन आजूबाजूचा परिसर दणाणून सोडला.
सदर प्रचार फेरीत पक्षाचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सचिव दत्तात्रय सूर्यवंशी, वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष अनिल धात्रक, जनहित कक्ष उपशहर अध्यक्ष चंद्रकांत महाडिक, महिला सेना उपशहर अध्यक्षा प्रिया गोळे, उपशहर अध्यक्षा, शुभांगी बंदीछोडे, शहर सचिव गायत्री शिंदे, जनहितकक्ष ऐरोली महिला विभाग संघटक, अनघा देशमुख, मृणाल महाडिक, विभाग अध्यक्षा यशोदा शिंदे, शुभांगी यादव, सोनल बुटकी, कृष्णन्न्न अय्यर, जनहित कक्ष विभाग अध्यक्षा अंधा देशमुख, उपविभाग अध्यक्षा सुवर्णा भोसले, भारती पाटील, शाखा अध्यक्षा ज्योती सैद, मेधा फदाले, ज्योती खाडे, उपशाखा अध्यक्षा सुषमा गायकवाड, जनहित कक्ष ऐरोली विधानसभा अध्यक्ष शेखर मढवी, विभाग अध्यक्ष अनिल ससाणे, विनोद कडू, धनंजय भोसले, राजू यादव, अनिल राठोड, प्रवीण साळुंके, भगवान मसुरकर, विक्रांत मालुसरे, उपविभाग अध्यक्ष रुपेश कदम, रितेश खुडे, महादेव थोरवे, अविनाश ठाकूर, विजय जोंधळे, शाखा अध्यक्ष विवेक सिंग, सुनील भोसले, प्रवीण घोगरे, कय्याम शेख, जनहित कक्ष कोपरखैरणे विभाग संघटक समीर जाधव, समाजसेवक शंकर काटेकर, विनोद पोखरकर, सुभाष पाटील, संभाजी खबाले यांच्या सह असंख्य स्थानिक रहिवाशांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर प्रचार फेरीची सांगता झाली.