* नेरूळ भागात निवडणूक प्रचार फेरीदरम्यान विकासपुरूष गणेश नाईक यांचे जल्लोषात स्वागत
सुजित शिंदे
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांची गुरुवारी नेरूळ परिसरात निवडणूक प्रचार फेरी निघाली. या प्रचार फेरीमध्ये नागरिकांनी विकासपुरूष गणेश नाईक यांचे जल्लोषात स्वागत करून विजयासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
एसआयइएस कॉलेज येथून या प्रचार फेरीला प्रचंड उत्साहात सुरूवात झाली. ठिकठिकाणी नाईक यांचे महिलांनी औक्षण केले. नेरूळ सेक्टर-९, दारावे गाव, हावरे मॉल, शनी मंदिर, भिमाशंकर सोसायटी इत्यादी भागामध्ये नागरिकांना अभिवादन करून नाईक यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
‘वनटाईम प्लॅनिंग’च्या माध्यमातून नवी मुंबईला ‘जागतिक दर्जाचे शहर’ म्हणून नावारूपास आणण्याचा दृढनिश्चय नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केला. नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी म्हणून पालिकेच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवून घेतल्या आहेत. २० वर्षांपर्यंत मालमत्ता करांमध्ये कोणतीही वाढ करणार नाही, असे अभिवादन नवी मुंबईकरांना दिले होते. गेली १० वर्षे या निर्णयाची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे. नवी मुंबईत चोवीस तास पाणीपुरवठा आहे. आधुनिक शिक्षणाच्या सुविधा आहेत. पायाभूत आणि परिवहनच्या उत्तम सुविधा आहेत. त्यामुळे राहण्यासाठी इतर शहरांमधील नागरिक नवी मुंबईला प्रथम प्राधान्य देतात. माझे नवी मुंबईकर सुखी समाधानी जीवन जगत असल्याबद्दल मला समाधान वाटते, अशा भावना नाईक यांनी जनसमुदायासमोर मांडल्या. प्रकल्पग्रस्तांनी आणि इतर सर्व घटकांनी गाव आणि गावठाण क्षेत्रात केलेल्या निवासी तसेच वाणिज्यिक बांधकामांना संरक्षण मिळवून दिले. २.५ एफएसआयच्या माध्यमातून सिडको निर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला शासनाकडून मान्यता मिळवून दिली आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने यासंबंधीचा जी.आर. निघालेला नाही. आचारसंहिता संपताच हा जी.आर. निघेल. त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना भीक घालू नये, असे आवाहन नाईक यांनी केले.
शहरातील झोपडपट्ट्यांना संरक्षण मिळवून दिले असून त्या झोपडपट्ट्यांचा विकास होणार आहे, असे नाईक म्हणाले. नवी मुंबईची जनता सुज्ञ असून या शहराचा विकास कोणी केला, हे ती जाणते आणि म्हणूनच बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच पुन्हा एकदा दैदीप्यमान असा विजय प्राप्त होईल, असा विश्वास लोकनेते नाईक यांनी व्यक्त केला.
आजच्या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादीचे नवी मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत बिराजदार, उपमहापौर अशोक गावडे, नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी नगरसेवक रविंद्र इथापे, नगरसेविका सुरेखा इथापे, नगरसेवक सुरेश शेट्टी, नगरसेवक संदीप सुतार, माजी नगरसेविका सलुजा सुतार, पालिका शिक्षण मंडळाचे सदस्य अर्जुन सिंघवी, ज्येष्ठ समाजसेवक भाई कांबळे, भालचंद्र नलावडे, भास्कर शेट्टी आदी उपस्थित होते.