ऐरोली / वार्ताहर
ऐरोली विधानसभा मतदार संघ कोपरीगाव या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ऐरोली विधानसभेचे उमेदवार गजानन खबाले यांचा प्रचार फेरीच
सकाळी आयोजन केले गेले होते. यावेळी स्थानिक रहिवाशी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच महिला मिळून १५० ते २०० च्या संखेने उपस्थित राहिले. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी ठिकठिकाणी चौका चौकात फटाके वाजून आपल्या लाडक्या उमेदवारो स्वागत केले. शेकडोंच्या संखेने सहभागी झालेल्या प्रचार फेरीमुळे विरोधी पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. गजानन खबाले यांना कोपरीगाव, कोपरखैरणे, ऐरोली, दिघा, राबाडा, घणसोली घरोंदा परिसरातील माथाडी कामगारांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता ऐरोली मतदार संघात गजानन खबाले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सामान्य जनतेचा, स्थानिक रहिवाशांचा, सर्वच जाती धर्माच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात गजानन खबाले यांना पाठींबा मिळत आहे. आपला माणूस, साधा माणूस आता इतिहास नाही विकास घडवायचाय, तो हि तुमच्या साथीने तुमच्या आशिर्वादाने यांची त्यांची कोणाची नाय, नवी मुंबई फक्त मनसेची हाय यासारख्या अनेक घोषणा देऊन आजूबाजूचा परिसर दणाणून सोडला. सदर प्रचार फेरीत पक्षाचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष अनिल धात्रक, जनहित कक्ष उपशहर अध्यक्ष चंद्रकांत महाडिक, महिला सेना उपशहर अध्यक्षा प्रिया गोळे, उपशहर अध्यक्षा, शुभांगी बंदीछोडे, शहर सचिव गायत्री शिंदे, मृणाल महाडिक, जनहितकक्ष ऐरोली महिला विभाग संघटक डॉ. अनघा देशमुख, विभाग अध्यक्षा यशोदा शिंदे, शुभांगी यादव, सोनल बुटकी, कृष्णन्न्न अय्यर, जनहित कक्ष विभाग अध्यक्षा, उपविभाग अध्यक्षा सुवर्णा भोसले, भारती पाटील, जनहित कक्ष ऐरोली विधानसभा अध्यक्ष शेखर मढवी, विभाग अध्यक्ष अनिल ससाणे, विनोद कडू, धनंजय भोसले, राजू यादव, भगवान मसुरकर, महादेव थोरवे, अविनाश ठाकूर, विजय जोंधळे, समाजसेवक शंकर काटेकर, सुभाष पाटील, संभाजी खबाले, विनोद पोखरकर यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर प्रचार फेरीची सांगता झाल