मुंबई: ज्या रात्री सलमानच्या गाडीला अपघात झाला त्या रात्री हॉटेलमध्ये आलेल्या सलमान खानला मी पार्किंग तिकीट फाडून दिलं होतं. त्यावेळी सलमाननं मला ५०० रुपये ‘टीप’ही दिली. मात्र हॉटेलमधून निघून जाताना गाडी कोण चालवत होतं हे आपण त्यावेळी पाहिलं नाही, अशी साक्ष जुहू इथल्या हॉटेलच्या पार्किंग स्लॉटमध्ये काम करणार्यात कर्मचार्याणनं आज सत्र न्यायालयात दिली.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विचारलेल्या प्रश्नारला उत्तर देताना हा साक्षीदार म्हणाला की, सलमानची कार ज्यावेळी आपल्या हॉटेलच्या पार्किंग स्लॉटमध्ये आली होती. त्यावेळी ड्रायव्हरच्या सीटवर आपण सलमानला पाहिलं होतं. परंतु हॉटेलमधून निघून जाताना त्या सीटवर कोण होतं ते मी पाहिलेलं नाही, असंही हा साक्षीदार म्हणाला.
कल्पेश वर्मा असं या साक्षीदाराचं नाव आहे. सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी सलमाननं पार्किंगचे पैसे भरल्याची पावती सादर होऊ शकते का, असा सवाल वर्मा यांना केला़ ही पावती आपण पोलिसांना दिल्याचं वर्मा यांनी न्यायालयाला सांगितलं.
या वेळी अमिन शेख या साक्षीदाराचीही साक्ष नोंदवण्यात आली़ ते म्हणाले, त्या दिवशी मी अपघात झालेल्या त्या बेकरीजवळ झोपलो होतो़. अपघात झाला तेव्हा मोठा आवाज झाला़ त्यावेळी तिथं जमलेले सर्व जण सलमानला गाडीतून बाहेर येण्यास सांगत होते.