पालघर / वार्ताहर
पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील ४८ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाला सरकारी नोकरीतील शंभर टक्के आरक्षण लागू केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहीष्कार टाकला आहे.
राज्यपालांनी नोकरी भरती संदर्भात काढलेल्या अध्यादेशामुळे आमच्या मुलांनी करायचे काय, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी केला आहे.
यापूर्वी शासनाला आणि निवडणूक आयोगाला ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. मात्र याची दखल त्यांनी न घेतल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावांमध्ये काही आदिवासी मतदारांनी मतदान केले.