सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शिवसेना पुरस्कृत शिवसमर्थ महिला प्रतिष्ठानच्या वतीने नेरूळ-सिवूड्समधील महिलांकरीता अल्प दरात प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत असून शिवसेना विभागप्रमुख संतोष मोरे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.
या प्रशिक्षण वर्गामध्ये केक बनविणे व सजविणे, आईसस्क्रीम बनविणे, फळे व भाजी सजावट, संस्कार भारती रांगोळी, मेंहदी प्रशिक्षण आदीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिवूड्स दारावे सेक्टर २३ मधील प्लॉट १०९ मधील शिवालय सोसायटीतील शिवसेना शाखेतून सांयकाळी ६ ते ९ या वेळेत प्रवेश अर्ज भेटणार असून ६ फेब्रुवारी ही नावनोंदणीची अंतिम तारीख आहे. या प्रशिक्षण वर्ग आयोजनासाठी उपविभागप्रमुख संतोष पाटील, शाखाप्रमुख मिलिंद पडवळ, पी.के. विजयन, उपशाखाप्रमुख प्रदीप पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या मनिषा मोरे, हेमा पाटील, उषा पाटील, विना श्रीवास्तव, लतिका गायकर, रूपाली नायकोडी, निलम पंधारे आदी मेहनत करत आहेत. महिलांनी स्वबळावर सक्षमपणे स्वंयरोजगारातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी या हेतूने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याचे विभागप्रमुख संतोष मोरे यांनी सांगितले. प्रशिक्षण वर्गाबाबत अधिक माहितीकरीता ९८२१५१५०६२ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.