संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात अवघ्या दीड महिन्याने येवू घातलेल्या महापालिकेचे पडघम नवी मुंबईच्या कानाकोपर्यात उमटू लागले आहेत. प्रभाग १११ मधील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता बेलापुरमधील भाजपाच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते होत आहे.
सिवूड्स सेक्टर ४६ मधील नवरत्न हॉटेलसमोर भाजपाच्या या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असून भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी.व्ही. रेड्डी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यालयाच्या ठिकाणी मोफत वायफाय सेवेचा शुभारंभदेखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सीवूडवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दत्ता घंगाळे यांनी केले आहे.