शरदचद्रं पवार यांचे प्रतिपादन
संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : सर्वांना हेवा वाटावा असे आपले वाटणारे नवी मुंबई शहर घडविणारे गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंड फडकवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी शनिवारी कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या भव्य पटांगणावर पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
या मेळाव्यास लोकनेते गणेश नाईक, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील, महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर नाईक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, वरिष्ठ पदाधिकारी आणि नगरसेवक मडळी मोठया संख्ंयेने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पवार यांनी राज्यातील युतीच्या आणि केंद्रातील एनडीएच्या सरकारचे वाभाडे काढले. ज्यांच्या हातात मोठ्या विश्वासाने सत्तेची चावी दिली त्यांनीच विश्वासघात केला आहे. गणेश नाईक माथाडींच्या हितसाठी झटले. सत्ताधार्यांनी माथाडींचा कायदाच बदलण्याचा घाट घातला आहे. शेतकर्यांवर अन्याय करणारे भुमीसंपादक विधेयक मंजुर करु पाहत आहेत. सर्वसामान्यांसाठी युपीए सरकारने आणलेले अन्न सुरक्षा योजनेत बदल केले आहेत. कामगारविरोधी कायदे आणत आहेत. त्यामुळे या मंडळींना निवडून दिल्याचा पश्चाताप जनतेला होत असल्याचे ते म्हणाले.
गणेश नाईक यांनी दुरदर्शी नेतृत्वाने फार पूर्वीच नवी मुंबईला स्मार्ट शहर घडविले आहे. इतर महापालिकांचे बहुतांश उत्पन्न हे प्रशासनावर खर्च होते तर नवी मुंबईत १०० रुपयातील केवळ १० टक्के प्रशासनावर आणि उर्वरित ९० टक्के उत्पन्न हे विकासकामांवर खर्च होतात. इतर महापालिकांमध्ये नेमके उलटे समिकरण आहे असे पवार म्हणाले. दुष्काळामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
केंद्राकडून निधी येणार आहे अशी खोटी आश्वासने राज्यातील युती सरकार देत आहे असा आरोप त्यांनी केला. आघाडी शासनाच्या काळात १ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता याची आठवण त्यांनी करुन दिली. भुसंपादन कायद्यात बदल न झाल्यास आम्ही राज्य सभेत त्याला विरोध करु, असेही ते म्हणाले.
नवी मुंबईला प्रगतीपथावर ठेवणारे आणि सर्वधर्मसमभाव जपणारे असे गणेश नाईक यांचे नेतृत्व असल्याचे तटकरे म्हणाले. त्यांच्या दुरदर्शी नेतृत्वामुळे नवी मुंबई हे देशात अग्रेसर शहर झाल्याचे गोरवोदगार त्यांनी काढले.
लोकनेते गणेश नाईक यांनी आपल्या प्रस्तावणापर भाषणात सांगितले की जनतेची दिशाभूल करुन खोटी आश्वासने देवून विरोधकांनी यापूर्वी विजय संपादित केला. त्यांच्या भ्ाुलथांपाना बळी पडू नका. पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. शहरात उमेदवारी देण्याच्या टोळ्या निर्माण झाल्या आहे. त्यांच्यापासून सावध रहा अशी सुचना करीत मी देईल त्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.