संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : जनआंदोलनात रमणारा, प्रबोधनासाठी पथनाट्य करणारा व एका आगळ्यावेगळ्या समाजपरिवर्तनाच्या ध्येयाने पछाडलेल्या ‘अवलिया’ गजानन काळेंनी मनसे नवी मुंबई शहरअध्यक्षपदाची धुरा सांभाळली असली उपक्रम राबविताना आपला सामाजिक दृष्टीकोन आजही गजानन काळेंनी जोपासलेला पहावयास मिळत आहे. शिवजंयतीच्या दिनी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात मोफत पुस्तकांचे वितरण करताना मनसेचे शहरअध्यक्ष गजाजन काळे यांनी शिवजंयती उत्सवाला प्रबोधनाची सांस्कृतिक झालर देण्याचा प्रयास केला आहे.
नवी मुंबईच्या कानाकोपर्यात शिवजंयती उत्सव उत्साहात साजरा केला जात असून दहावीच्या परिक्षा सुरू असतानाही महापालिका निवडणूका तोंडावर आलेल्या असतानाही राजकीय चमकेश घटकांनी ध्वनीप्रदूषणाच्या माध्यमातून शिवजंयतीचा घाट घातलेला अनेक ठिकाणी पहावयास मिळाला. पण याला बाबतीत मनसेचे गजानन काळे व त्यांनी मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या शिवजंयती उत्सवाचे आगळेवेगळेपण उठून पहावयास मिळाले.
प्रबोधनकार ठाकरेलिखित ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकाचे मनसेचे शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी वाचकांना मोफत वितरण केले. मध्यवर्ती कार्यालयासमोर सार्वजनिक शिवजंयती उत्सवाचे आयोजन मनसेकडून केलेले असतानाही पुस्तक वितरणाची झालर या कार्यक्रमाला जोडताना शिवजंयती उत्सवाला प्रबोधनात्मक सांस्कृतिक स्वरूप देण्याचा प्रयास गजानन काळेंनी केला. ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकाच्या १००० प्रतीचे वितरण शिवजंयतीच्या दिनी करण्यात आले असून प्रभागाप्रभागातील शाखांना व मनसे पदाधिकार्यांना तसेच मनसैनिकांनाही या पुस्तकांचे वितरण भेट स्वरूपात केले जाणार असल्याची माहिती गजानन काळे यांनी दिली.