मुंबई : एकेकाळी पॉर्न सिनेमांमध्ये काम करणारी आणि सध्या बॉलिवूडमध्ये काम करणार्या सनी लिओनला तिच्या राहत्या भाड्याच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, हे घरं दुसरं तिसरं कुणाचं नसून अभिनेत्री सेलिना जेटली हिच्या मालकीचं आहे.
मुंबईला स्थायिक झाल्यानंतर सनी या घरात आपल्या पतीसोबत राहत होती. एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सनी स्वत:साठी दुसरं घर शोधतेय. पण, अनेक सोसायटीजनं सनीला घर देण्यापासून नकार दिला.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सनी घरासाठी जास्त भाडं द्यायलाही किंवा घर विकत घेण्यासाठीही तयार होती पण सोसायटीमध्ये राहणार्या लोकांनी अॅडल्ट स्टार म्हणून ओळखल्या जाणार्या सनीला घर देण्यापासून नकार दिला.
एका सूत्रानं दिलेल्या बातमीनुसार, सेलिनानं नुकतीच आपल्या म्हणजेच सनी राहत असलेल्या घराला अचानक भेट दिली. तेव्हा तिला संपूर्ण घरात केवळ कचरा आणि पसाराच दिसला. बाथरूम तर पाहण्यासारखंही नव्हतं. तसंच घरातलं फर्नीचर बालकनीमध्ये अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेलंही तिला दिसलं. त्यामुळे संतापलेल्या सेलिनानं ताबडतोब सनीला हे घर खाली करण्यास सांगितलंय.