गुवाहाटी – आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात शनिवारी एका पॅसेंजर रेल्वेचे पाच डबे आणि इंजिन रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत रेल्वेचा मोटरमन गंभीर जखमी झाला तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
सलाकटी आणि बासूगांव दरम्यान सकाळी पाच वाजून 15 मिनिटांच्या सुमारास 55753 यूपी सिफुंग पॅसेंजरचे इंजिन आणि पाच डबे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ते जयम्ता शर्मा यांनी दिली. नदीच्या पुलावरुन जात असताना हा अपघात झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रेल्वेच्या चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे ते म्हणाले.