पनवेल – म्हाडाची सोडत अर्जदारांना घरबसल्या किंवा आहे त्या ठिकाणी पाहता यावी, यासाठी गेल्या वर्षी प्रथमच सोडतीच्या थेट प्रक्षेपणाची योजना राबवण्यात आली होती. यंदाही सोडतीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
यंदा अर्जदारांच्या संख्येने लाखांचा टप्पा पार केल्याने मोठ्या प्रमाणावर अर्जदार सोडतीच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण बघण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने सोडतीच्या संकेतस्थळाच्या सव्र्हरची क्षमता वाढवली आहे. जवळपास 30 ते 40 हजार जण एकाच वेळी विनाव्यत्यय थेट प्रक्षेपण पाहू शकतील.
येत्या 31 मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात 1 हजार 063 घरांसाठीची सोडत काढण्यात येणार आहे. 1 हजार 063 घरांसाठी लाखाहून अधिक अर्ज आल्याने रंगशारदा सभागृहात होणारी गर्दी लक्षात घेता व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हाडाने उपाययोजना आखल्या आहेत. यासोबतच सोडतीच्या संकेतस्थळावर होणारे थेट प्रक्षेपण अर्जदारांना विनाव्यत्यय पाहता यावे यासाठी संकेतस्थळाच्या सर्व्हरची क्षमताही वाढवण्यात आली आहे.
घरांसाठी नोंदणी करण्यासाठीच्या अखेरच्या दिवशी एकाच वेळी बहुतांश अर्जदार नोंदणी करत असल्याने संकेतस्थळावर ताण पडला होता. यामुळे संकेतस्थळ अत्यंत संथ गतीने चालत होते. सोडतीच्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या वेळीस असे घडू नये, यासाठी म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने सव्र्हरची क्षमता 30 ते 40 हजारांपर्यंत केली आहे. सोडतीच्या दिवशी संकेतस्थळावर थेट प्रक्षेपणाची लिंक देण्यात येणार आहे.
सर्व्हरवर ताण पडू नये, यासाठी वेळोवेळी चाचण्या आम्ही घेत आहोत. सोडतीच्या दिवशी सर्वाना सभागृहात येणे शक्य होत नाही. त्यामुळे थेट प्रक्षेपणाची योजना आखली होती. गेल्या वर्षी याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाही अर्जदारांना सोडतीचे प्रक्षेपण विनाव्यत्यय पाहता यावे, यासाठी सर्व्हरची क्षमता आम्ही वाढवली आहे, असे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले.
* घरांसाठी 1 लाख 24 हजारांहून अधिक अर्ज
सोडतीतील घरांसाठी 1 लाख 50 हजार 500 अर्ज दाखल झाले आहेत. डीडीद्वारे अनामत रक्कम भरणार्या अर्जदारांचा आकडा अपडेट होत असून, शुक्रवारी हा आकडा 1 लाख 24 हजार 356पर्यंत पोहोचला.