राजेंद्र पाटील
उरण : शेलघर गावचे ज्येष्ठ नागरीक, स्वर्गीय जर्नादन आत्माराम भगत साहेबांचे जीवश्य, कंठश्य मित्र, ज्यांनी स्व. भगत साहेबांना तहहयात साथ दिली त्या जोमा नारायण घरत यांचे काल रात्री 11.30 वाजता सहस्त्रबुद्धे रूग्णालयात उपाचार घेत असताना द्धदयविकाराचा झटका येद्वन वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. मार्च महिन्यात त्यांच्या नव्वदावा वाढदिवस शेलघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अतिशय धुमधडाक्यात साजरा झाला होता. त्यावेळी जोमा नारायण घरत यांच्या शुभहस्ते सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या दिड कोटी निधीच्या समाजमंदिराचा शुभारंभ करण्यात आला. त्याच बरोबर स्मशानभुमी नुतनीकरण, माध्यमिक विटालय वॉल कंपाउंड व इतर कामांचा ही प्रारंभ करण्यात आला व शाल श्रीफळ व भलामोठा गुलाबपुष्पांचा पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या जाण्याने घरत परिवार व गव्हाण पंचक्रोशीवर दु:खाचे सावट पसरले आहे. जोमा नारायण घरत हे कामगार नेते महेंन्द्रा घरत यांचे मोठे काका तर अरूणशेठ भगत यांचे श्वसुर व माजी प. स. सदस्य रघुनाथशेठ घरत यांचे मोठे बंधू त्यांच्या अंत्यविधीसाठी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महेंन्द्रा घरत, अरूण भगत, रघुनाथ घरत, भाद्वशेठ पाटील, नगरपालिका सभापती अनिल भगत, माजी उपसभापती हरिश्चंद्र ठाकूर व मोठया प्रमाणावर नागरीक व आप्तेष्ठ उपस्थित होते. त्यांचे मागे दोन मुलगे, दोन मुली, भाद्व, पुतणे, नातवंड, पतवंड असा फार मोठा परिवार आहे.