पुणे : शहरातील हायप्रोफाईल वेश्या व्यवसायच चर्चेत आला आहे. शहरात व्हॉटस अॅप, फेसबुक आणि ऑनलाईन एस्कॉर्टच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे.
या व्यवसायावर अंकुश आणणे पोलिसांसाठी कठीण काम नसल्याचंही सांगितलं जातंय, कारण ठराविक टोळ्यांकडून हा व्यवसाय चालवला जात आहे, मात्र याचा अर्थपूर्णपणे पोलिसांना कळत नसल्याचं म्हटलं जातंय.
या व्यवसायात अडीचशे तरूणी या टोळक्याशी कनेक्टेड असल्याचं म्हटलं जातंय. यात तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात मदत घेतली जात असल्याने, हा व्यवसाय आटोक्यात आणणे पोलिसांसाठी सोप असल्याचं म्हटलं जात आहे.
व्हॉटस अॅपवर ग्राहकाला आधी तरूणीचे फोटो दाखवले जातात, त्यानंतर अपेक्षित स्थळी तरूणीला पोहोचवलं जातं, यासाठी 20 ते 30 वाहनं कार्यरत असल्याचं सांगण्यात येतंय.
एकाच वेळी पाच ते सहा हजारात डील होत असल्याने यात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असल्याचंही सांगण्यात येतंय, काही ठिकाणी टूरवर घेऊन जाण्यासाठी कंत्राटी पद्धतीने तरूणींना सोबत टूरवर नेलं जात असल्याचंही सांगण्यात येत आहे. या तरूणी परराज्यातून आणल्या जात असल्याचंही सांगण्यात येतंय.
पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे, मात्र असे व्यवसाय चर्चेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत असल्याचंही पुढे येतंय. या व्यवसायात सहभागी असलेल्या तरूणी आणि एजंट कोण आहेत हे समोर येणे महत्वाचे असल्याचंही सांगण्यात येतंय.
सध्या गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याने, ते यावर काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्षं लागून आहे.