मुंबई : स्मार्टफोननं तरुणाईचं अवघं आयुष्यच बदललं आहे. सेल्फीची क्रेझ तर एवढी वाढली आहे की, मुली यात आठवड्यातील पाच तास घालवतात.
एका अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की, मुली रोज 48 मिनिटं तर आठवड्यातील पाच तास सेल्फी काढण्यात घालवत आहेत. मिरर डॉट को डॉट यूके या वेबसाईटनुसार चांगली सेल्फी घेण्यासाठी मेकअप, लाईट आणि योग्य अँगल यासाठी हा वेळ मुली खर्च करतात.
या वेबसाईटनं या सर्वेत 2000 मुलींना सहभागी केलं होतं. यातील 28 टक्के मुलींनी सांगितलं की, त्या आठड्यातून किमान एकदा तरी सेल्फी काढतात. तसंच काही महिलांनी सांगितलं की खराब मूडला चांगली सेल्फी चांगल्या मूडमध्ये बदलते.
ब्रिटीश वेबसाईट फीलिंगयूनिक डॉट कॉमनं केलेल्या सर्व्हेनुसार, 27 टक्के मुली सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला जास्त लाईक्स नाही मिळाल्या की, काही मिनिटातच तो फोटो काढून टाकतात. या सर्व्हेनुसार मुली सहा ते सात फोटोंनंतर एक चांगली सेल्फी किमान दोन सोशल साईटवर अपलोड करतात.