लाहोर : भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा सात वर्षापूर्वीचा रेकॉर्ड काल पाकिस्ताननं मोडला आहे.
पाकिस्ताननं झिम्वाब्वेविरुद्ध लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये 375 धावा केल्या. पाकिस्तानमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी हा रेकॉर्ड भारताच्या नावे होता. भारतानं कराचीत हाँगकाँगविरुद्ध 2008मध्ये 374 धावा केल्या होत्या.
याआधी पाकिस्तान टीमचा पाकिस्तानमध्ये 353 हा सर्वाधिक स्कोअर होता. जो त्यांनी इंग्लंडविरुद्ध 2005मध्ये कराचीत बनवला होता. पाकिस्तानच्या कालच्या सामन्यात त्याच्या पहिल्या चार खेळाडूंनी 70 पेक्षा जास्त रन केले. मोहम्मद हाफिजने 86, अजहर अलीनं 79, शोहेब मलिकने 112 आणि हारिस सोहेलने नाबाद 89 रन्स बनवले.
एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली वेळ आहे, ज्यात एका डावात चार खेळाडूंनी 70 पेक्षा जास्त रन केले. तर चार खेळाडूंनी 50 पेक्षा जास्त रन करण्याची ही एकदिवसीय क्रिकेटमधील 50वी वेळ होती.
पाकिस्तानचा हा एकदिवसीय सामन्यातील दुसरा सर्वोच्च स्कोअर आहे. बांगलादेशविरुद्धचा 385 हा पाकिस्तानचा सर्वोच्च स्कोअर आहे.