पनवेल : देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास 1100 जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक 852 जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात 266 नागरीकांचा मृत्यू झाला.
दिल्लीमध्ये गर्मीनं लोकं बेहाल झाले आहेत. सोबतच तेलंगणा, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये प्रचंड गर्मीनं नागरिक हैराण झाले आहेत. यात राज्यांमध्ये अधिक तापमानानं 45 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाशिवाय दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्रि्चम बंगालमध्ये तापमान 45 डिग्री होतं. खाजगी हवामान एजंसी स्कायमेटनुसार ओडिशाच्या अंगुलमध्ये सर्वाधिक तापमान 47 डिग्री नोंदवलं गेलंय. तर महाराष्ट्रात चंद्रपूर आणि वर्धा इथं क्रमश: 46.6 आणि 46.6 डिग्री तापमानाची नोंद झाली.
उत्तर आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये गर्मीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. कारण पुढील दोन दिवसांमध्ये वादळासह पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळं तापमान काहीसं खाली जाईल. दुसरीकडे काश्मीर घाटीमध्ये वातावरण चांगलं आहे आणि तिथलं अधिक तापमान 22 डिग्री नोंदवलं गेलं.