नागपूर : मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर बाहेर आलेला कुख्यात गुंड आणि माजी आमदार अरुण गवळीच्या पॅरोलची मुदत वाढवण्यात आल्याने तो आणखी काही दिवस तुरुंगाबाहेर राहणार आहे.
अरुण गवळीच्या पॅरोलच्या रजेत 12 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नऊ मे रोजी अरुण गवळीचा मुलगा महेश गवळी याचे लग्न पार पडले. या लग्नासाठी गवळीने पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. 30 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता.
त्यानंतर आईच्या आजारपणाचे कारण सांगत आणखी 30 दिवसांची पॅरोल रजा देण्याची मागणी त्याने केली होती. मात्र नागपूर विभागीय आयुक्तांनी त्याला 14 दिवसांची वाढीव रजा मंजूर केली आहे. त्यामुळे 12 जूनपर्यंत गवळी तुरुंगाबाहेर राहणार आहे.